Taarak Mehta ka Ooltah Chashmah- Jethalal Exit, going US? New twist... Google
मनोरंजन

Taarak Mehta: जेठालालचीही एक्झिट? दिलीप जोशी चालले अमेरिकेला...

गेल्या काही महिन्यांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून अनेक प्रसिद्ध कलाकारांनी एक्झिट घेतली आहे.

प्रणाली मोरे

Taarak Mehta Ka Ooltah Chahsmah: छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता'ला जणू ग्रहणच लागलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेतील गाजलेल्या भूमिका साकारणारे कलाकार एकामागून एक बाहेर पडताना दिसत आहे. यावरनं जोरदार चर्चा रंगली आहे,आणि ती आपल्यापासून काही लपून राहिली नाही. दयाबेन आणि तारक मेहता या दोन व्यक्तिरेखांनी तर या मालिकेच्या चाहत्यांच्या मनावर गेली अनेक वर्ष राज्य केलं. (Taarak Mehta ka Ooltah Chashmah- Jethalal Exit, going US? New twist...)

पण अचानक यांच्या एक्झिटनं मालिकेच्या निर्मात्यांपासून चाहत्यांपर्यंत सगळेच हैराण असताना आता नवीन बातमी कळतेय की मालिकेत जेठालाल ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारणारे उरले-सुरले दिलीप जोशी देखील मालिकेपासून दूर जाण्याचा विचार करतायत. म्हणजे एका कारणामुळे तशी चर्चा रंगली आहे. आधीच निर्माते असित मोदी तारक मेहता आणि दयाबेन व्यक्तिरेखांसाठी रीप्लेसमेंट शोधताना हैराण झालेत त्यात आता दिलीप जोशी म्हणजे जेठालालला काय झालं हा विचार सर्वसामान्यांच्या मनात येईलच. तर चला,जाणून घेऊया का रंगलीय जेठालाल उर्फ दिलीप जोशी मालिकेतून एक्झिट होतायत अशी चर्चा.

तर सुरुवातीला जेठालाल यांची मालिकेतून एक्झिट होतेय या बातमीनं हिरमुसलेल्या मालिकेच्या चाहत्यांसाठी इथं स्पष्ट करतो की जेठालाल अमेरिकेला चाललेयत पण मालिकेतील एक भाग म्हणून असं देखील कानावर पडत आहे. तर मालिकेतला एक भाग असा चित्रित करण्यात आलाय ज्यात नट्टू काका आणि बाघा आपल्या मालकासाठी खूप खूश असतात. त्यांना आपल्या मालकासोबत एक सरप्राइज शेअर करायचे असते. पण ते सहज त्यांना तसं सांगायचं नसतं. सुरुवातीला दोघे मिळून जेठालालचं स्वागत करतात. आणि मग ते असे रिअॅक्ट का होतायत यामुळे जेठालाल संभ्रमात पडतात.

तेव्हा जेठालालला बाघा आणि नट्टू काकांवर संशय येतो की हे नेमकं माझ्यापासून काय लपवत आहेत. बाघा आणि नट्टू काका उगाचच डान्स करायला सुरुवात करतात ज्यानं जेठालाल हैराण होतो. मग शेवटी दोघे, जेठालालला त्याच्या अेरिकेला जाण्याच्या संधीविषयी बोलतात. पण आता इथेच एपिसोड थांबवल्यामुळे चर्चा रंगली की जेठालालही एक्झिट होतायत की काय. जेठालाल अमेरिकेला गेलेले दाखवणार म्हणजे ही व्यक्तिरेखा देखील इथेच थांबणार की काय असं लोक बोलताना दिसत आहेत.

त्यामुळे आता नवीन भागातच हे अमिरेका प्रकरण का दाखवलंय, नक्की हा मालिकेतला ट्वीस्ट असेल की जेठालाल उर्फ दिलीप जोशींची मालिकेतून एक्झिट हे जाणून घेण्यासाठी आता चाहते उत्सुकही आहेत आणि त्यांना थोडी चिंताही लागून राहिली आहे.कारण उरली-सुरली मालिकेतील पॉप्युलर व्यक्तिरेखा निघून गेली तर मग मजाच काय असाही विचार सध्या लोकांच्या मनात घोळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

SCROLL FOR NEXT