munmun dutta file image
मनोरंजन

बबिता सोडणार 'तारक मेहता..'मालिका? चर्चांवर निर्मात्यांनी दिलं उत्तर

अभिनेत्री मुनमुन दत्ता ही मालिकेत बबिताची भूमिका साकारतेय.

प्रियांका कुलकर्णी

गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (munmun dutta) ही अगदी सुरूवातीपासून यात काम करत आहे. या मालिकेमधील बबिता आणि जेठालाल या जोडीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. गेले काही दिवस मुनमुन ही मालिका सोडणार अशी चर्चा सुरू होती. यावर आता मालिकेच्या निर्मात्यांनी उत्तर दिलं आहे.(taarak mehta ka ooltah chashmah makers say about munmun dutta aka babita ji leaving show)

मालिकेच्या ‘मिशन कौवा’ या एपिसोडचे शूटिंग दमण येथे सुरू होते. त्यामुळे मालिकेच्या टिमला दमण येथे शिफ्ट करण्यात आले होते. या एपिसोडच्या शूटिंगमध्ये मुनमुन नव्हती. त्यामुळे तिने मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाली. पण तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताबद्दल अशी अफवा पसरत आहे की, ती मालिका सोडणार आहे. हे खोटे आणि चुकीचे आहे.'

काही दिवसांपूर्वी मुनमुन तिच्या युट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडीओमध्ये तिने जातीवाचक शब्द वापरले होते. याप्रकरणी सोशल मीडियावर तिच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. नंतर चूक लक्षात आल्याने मुनमुने सोशल मीडियावर माफीनामा सादर केला. या प्रकरणानंतर मुनमुन तारक मेहता मालिकेच्या सेटवर आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT