ghanshyam nayak 
मनोरंजन

'तारक मेहता..'चे नट्टू काका नेटकऱ्यांवर चिडले; म्हणाले..

स्वाती वेमूल

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक मालिकेत परतले आहेत. प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी काही वेळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता आणि जानेवारी महिन्यापासून त्यांनी पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. मात्र नट्टू काका ऑनस्क्रीन आजारी आणि अशक्त दिसत असल्याची टीका काहींनी सोशल मीडियावर केली. या ट्रोलिंगवर आता घनश्याम नायक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "काही लोक वृद्ध व्यक्तींसोबत असंवेदनशील वागतात. मी लोकांना विनंती करतो की त्यांनी अशाप्रकारची नकारात्मकता पसरवू नये. जर मी बरा दिसत नसतो, तर माझ्या निर्मात्यांनीच मला काम करू दिलं नसतं. काहींनी माझ्या कपड्यांच्या फॅशनविषयीही टिप्पणी केल्याचं मी वाचलं. ज्यांना काहीच काम नसतं, ते अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टी पसरवतात. मला काही फरक पडत नाही, कारण या वयातही मी फार खूश आहे. मी काम करतोय आणि जोपर्यंत माझं शरीर साथ देईल तोपर्यंत मी काम करेन."

"प्रत्येकजण एके दिवशी म्हातारा नक्कीच होतो आणि लोकांना आजारपणालाही सामोरं जावं लागतं. देवाच्या कृपेने मी आता पूर्णपणे बरा आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मी भविष्यातही काम करत राहीन. माझे कुटुंबीय, निर्माते असित कुमार मोदी आणि देवाच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झालंय", असं ते पुढे म्हणाले. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या दहा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT