Taarak Mehta Ka Ooltah Chashmah  File Photo
मनोरंजन

'तारक मेहता..'मध्ये सर्वाधिक मानधन कोणाला मिळतं?

जाणून घ्या, मालिकेतील कलाकाराचं मानधन

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने नुकतेच ३१०० एपिसोड्स पूर्ण केले. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. जेठालाल, दयाबेन, माधवी भिडे, भिडे मास्तर, तारक मेहता यांसारख्या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेच्या कथानकासोबतच त्यातील पात्रांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. मालिकेत विविध भूमिका साकारणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत, त्यांना मानधन किती मिळतं, सर्वाधिक मानधन कोणत्या कलाकाराला मिळतं, याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. तर या कलाकारांच्या मानधनाविषयी जाणून घेऊयात..

'इंडिया डॉटकॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, मालिकेत जेठालालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते दिलीप जोशी यांना सर्वाधिक मानधन मिळतं. दिलीप यांना एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये मिळतात. जुलै २००८ पासून या मालिकेत अभिनेते शैलेश लोढा हे तारक मेहताची भूमिका साकारत आहेत. त्यांना एका एपिसोडसाठी एक लाख रुपये मानधन मिळतं. या मालिकेत सर्वांत चर्चेत असलेली भूमिका म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तरांची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकरला एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये मिळतात.

हेही वाचा : गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली; पोस्ट केला व्हिडीओ

मालिकेतील जेठालाल आणि बबिता यांच्यातील केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून विशेष पसंती मिळते. बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताला प्रत्येक एपिसोडसाठी ३५ हजार ते ५० हजार रुपये मिळतात. तर जेठालालचे वडील चंपकलाल यांची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांना ७० ते ८० हजार रुपये मानधन मिळतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT