Taarak Mehta Ka Ooltah Chashmah set Esakal
मनोरंजन

#BoycottTMKOC: लोकांना वेड्यात काढणं बंद करा! तारक मेहता.. वर नेटकरी का भडकले? होतेय बॉयकॉटची मागणी

Vaishali Patil

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्ही मनोरंजन विश्वात तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोची बरीच चर्चा असते. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

या मालिकेतील अनेक कलाकार शो सोडून गेले तर अनेकांना मालिकेच्या निर्मात्यावर अनेक आरोपही केले. तरी देखील या मालिकेची क्रेझ कमी झाली नव्हती.

या शो मध्ये सर्वांची आवडती दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी ही गेल्या अनेक वर्षांपासून शोमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे चाहते तिला पुन्हा शोमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते मात्र तसं काही झालं नाही. दरवेळी केवळ ही अफवाच असते.

आगामी एपिसोडमध्ये 'दयाबेन' गोकुळधाममध्ये परत येणार असे दाखवण्यात येणार होते. एपिसोडमध्ये दाखवल्या प्रमाणे जेठालाल दयाच्या येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी सोसायटीच्या आवारात तासनतास तिची वाट पाहत असतो तर दुसरीकडे आई परतणार म्हणुन टप्पू देखील फटाके फोडतो.

दयाबेनच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण गोकुळधाम जल्लोष करताना दिसला. मात्र जेव्हा जेठालालने कारचा दरवाजा उघडला त्यावेळी ना दयाबेन गाडीतून उतरली ना सुंदर. हे पाहिल्यानंतर जेठालालसोबतच सर्व गोकुळधाममधील लोक नाराज झाली आहे.

मात्र केवळ गोकुळधाम मधील लोकच नाही तर प्रेक्षकही यामुळे खुप नाराज झाले आहे. दरवेळी दयाबेन येणार असं सांगून मालिकेची हाईप केली जाते आणि टिआरपी मिळवला जातो मात्र दयाबेन काही परतत नाही. त्यामुळे आता या मालिकेचे प्रेक्षक निर्मात्यांवर चांगलेच संतापले आहेत.

दयाबेनचा ट्रॅक इतक्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने चाहत्यांना अपेक्षा होत्या मात्र ती न परतल्याने चाहते निर्मात्यांवर संतापले आहेत. आता सोशल मिडियावर त्यांनी शोला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

एका नेटकऱ्याने लिहिलं की, 'हा शो निर्मात्यांनी खराब केला आहे. दरवेळी पोपटलालचे लग्न झाले आणि दयाबेन परतली असं सांगून लोकांना वेड्यात काढले जाते. त्यांना फक्त पैसा आणि टीआरपी हवा असतो. ते प्रेक्षकांच्या भावनांशी खेळतात.

तर दुसऱ्याने लिहिले, 'तुम्ही दया ला आणू शकत नसाल तर तिचे कॅरेक्टर संपवा, एवढी हाईप का बनवता आणि आमच्या भावनांशी खेळता.'

आता प्रेक्षकांचा चांगलाच अपेक्षा भंग झाल्याने सोशल मिडियावर '#BoycottTMKOC' ट्रेडिंग होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT