Taarak Mehta special episode where the whole cast will be seen the performances 
मनोरंजन

‘बेबी डॉल’ गाण्यावर ‘दया भाभी’ नाचते तेव्हा...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील डान्स रियालिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर कार्यक्रमाची अंतिम फेरी जवळ येत चालली आहे. त्यामुळे स्पर्धेतील चुरस वाढली आहे. एकापेक्षा एक सरस असे परफॉर्मन्सेस सादर होत असल्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. या वीकएंडला तारक मेहता खास भागामुळे खूप धमाल येणार आहे. या भागात तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे सर्व कलाकार यातील जबरदस्त परफॉर्मन्सेसचा आस्वाद घेत घेत मालिकेचे 3000 भाग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करणार आहेत.

यावेळी दया बेनची उणीव सर्वांना जाणवत होती. पण ऋतुजा जुन्नरकर आणि कोरिओग्राफर आशीष पाटील यांच्या ‘बेबी डॉल’ गाण्यावरचा परफॉर्मन्स आणि ऋतुजाने हुबेहूब साकारलेली दया बेन पाहून सर्व जण चकित झाले! पुण्याच्या ऋतुजा जुन्नरकरने दया बेनची भूमिका साकारुन केलेल्या सुंदर परफॉर्मन्समुळे तिनं सर्वांची वाहवा मिळवली. तिने आपल्या नृत्याने सर्वांना थक्क  केलं.

तिचं कौतूक करताना जेठालाल म्हणजे दिलीप जोशीला तर शब्दच सुचले नाहीत. ते म्हणाले, “क्षणभर तर मला वाटले की, दिशा जी (दया बेन) स्वतःच डान्स करत आहेत. ज्या प्रकारे ती मंचावर आली व तिने डान्स केला, ते अगदी हुबेहूब दिशा वाखानी सारखे होते. वेशभूषा आणि नृत्यातील बारकावे त्यांनी अगदी अचूक टिपले होते. मला खरोखर असेच वाटले की दिशा जी स्वतःच येथे परफॉर्म करत आहेत.”

या परफॉर्मन्सने प्रभावित झालेले असित कुमार मोदी म्हणाले, “ तिचे नृत्य लाजवाब होते. नृत्य जेव्हा त्याच्या हावभावासकट केले जाते तेव्हा त्याच्यातील भाव आणखी आनंद देणारा असतो.  गरब्याच्या जोडीने ऋतूजाने ज्या स्टेप्स केल्या, त्या आमची दया भाभी नेहमी करते, त्या तशाच होत्या.  मोदी पुढे म्हणाले, “आमच्या दिशा वाखानीने या व्यक्तिरेखेसाठी जी मेहनत केली होती,  गीता कपूर म्हणाली, “अॅक्ट झाल्यावर मी आशीषला विचारणारच होते की आज ऋतुजाला का घेऊन आला नाहीस? कारण मंचावर तर दया भाभीच डान्स करताना दिसत होती. दयाची व्यक्तिरेखा खूप महत्त्वाची आहे आणि दिशा वाखानीने ती खूप दमदारपणे सादर केली आहे. 
  
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

पंचनाम्याचे निकष शेतकऱ्यांच्या जिव्हारी! अतिवृष्टीच्या भरपाईसाठी ‘हे’ निकष अडचणीचे; ॲग्रीस्टॅक क्रमांक, ई-पीक पाहणी नोंदीचा अडथळा; शेतातील जिओ टॅगिंग फोटोचीही अट

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT