taarak mehtaka ooltah chashmah producer reveals if disha vakani will be back for episod 
मनोरंजन

तारक मेहता…’मधील सर्वांना हसवणारी 'ही' अभिनेत्री करणार कमबॅक, यावर निर्मात्यांनी काय सांगितलं असेल सत्य...? जरुर वाचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  अनेक दिवसांपासून सुरू असलेला कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा सर्वात लोकप्रिय शो मानला जातो. मागच्या अनेक वर्षांपासून या शोनं सर्वांना हसवण्याचं काम केलं आहे. कारण आजही हा शो तेवढ्याच टीआरपीमध्ये चालत आहे. काही दिवसांपूर्वीच अनलॉक एक मध्ये देण्यात आलेल्या शिथीलतेत या शोचं शूटिंग सुरू होणार आहे. 

दयाबेनची भूमिका साकरणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून या शोमध्ये दिसलेली नाही. मॅटरनिटी लिव्हवर गेलेली दिशा अद्याप या शोमध्ये परतलेली नाही. मागच्या काही काळापासून तिच्या कमबॅकच्या चर्चा सुरू आहेत. मात्र प्रेक्षकांच्या पदरी निराशेव्यतिरिक्त आणखी काहीच पडलं नाही. आता याबाबत या शोचे प्रोड्युसर असित कुमार मोदी यांनी मौन सोडलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दिशा वकानी या शोमध्ये परत येणार आहेत. या शोच्या सेटवर एक सेलिब्रेशनही केलं जाणार नाही.

कारण या शोला १२ वर्षं पूर्ण झाली आहेत. यानंतर एका मुलाखतीत या शोचे प्रोड्युसर असित कुमार मोदी यांनी दिशाच्या शो वापसीवर मौन सोडलं. ते सुरुवातीला हसले आणि म्हणाले, आधी शोचं शूटिंग सुरू तर होऊ देत. मी सध्या याबाबत काहीही सांगू शकत नाही. सध्या आम्ही शूटिंग पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. राज्य सरकारनं आम्हाला शूटिंगला परवानगी दिली आहे आणि मी त्यांच्या निर्णयावर खूप खूश आहे.

सध्या आम्ही हे शूटिंग पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. आशा करतो की, लवकरच सर्वकाही ठिक होईल. आम्ही सरकारच्या नियमांचं पालन करून शूटिंग लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT