मनोरंजन

'तू अजूनही तारे जमीन पर मधला जिनिअस'; ईशानचा नवा लूक

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अभिनित आणि दिग्दर्शित असलेला तारे जमीन पर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अभिनित आणि दिग्दर्शित असलेला तारे जमीन पर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. त्यामध्ये त्यानं केलेल्या निकुंभ सरांची भूमिका लोकप्रिय झाली होती. त्याही पेक्षा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता तो ईशान अवस्थी. डिस्लेकसिया आजारानं त्रस्त असणाऱ्या ईशानला मोठ्या कल्पकतेनं जगातील स्पर्धेसाठी तयार करणाऱ्या निकुंभ सरांची गोष्ट प्रेक्षकांना आवडली. त्यांनी तिचं मनापासून स्वागतही केलं. ईशानच्या भूमिकेला दाद दिली. आता ईशान अवस्थीचा एक आगळा वेगळा लूक व्हायरल झाला आहे.

ईशानचा मॅचो लूक तुम्ही पाहिला तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा ईशानच आहे ते. ईशानची भूमिका करणारा दर्शील आता 24 वर्षांचा झाला आहे. त्याचा आगळा वेगळा लूक असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या चाहत्यांनी त्या फोटोला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. हा तोच ईशान आहे का ज्याला लिहिण्या वाचण्याची समस्या होती. ज्यानं तारे जमीन पर मध्ये प्रभावी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चाहत्यांनी त्याच्या या नव्या लूकचं स्वागत करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

तारे जमीन पर जेव्हा प्रदर्शित होणार होता त्यावरुन सुरुवातीला त्याच्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले होते. मात्र अचानक त्याचे दिग्दर्शन आपण केल्याचा दावा आमिरनं केला आणि त्यावरुन वादाला सुरुवात झाली होती. त्यावेळी अमोल गुप्ते यांनी पत्रकार परिषदेतून या प्रकरणाचा खुलासा केला होता. बाकी काही का असेना हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. ईशानच्या भूमिकेत असणाऱ्या दर्शिलनं सर्वांची मनं जिंकून घेतली होती. तु अजूनही तितकाच जिनिअस आहे जेवढा तारे जमीन पर मध्ये होतास....अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दर्शिलला दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT