Taimur Ali Khan esakal
मनोरंजन

Video:तैमूरचा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल ...

नेटकऱ्यांनी केला कमेंटचा वर्षाव...

सकाळ डिजिटल टीम

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान हा नेहमीच चर्चेत असतो. तो कुठेही गेला तरी त्याच्या मागे पापाराझींची गर्दी असते. इतक्या लहान वयातच त्याची फॅन फॉलोविंग तगडी आहे.  तैमूर विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे. करीनाने तैमूर तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले होते. त्यांनतर तो तायक्वांदो खेळतांना जातांनाचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आता तैमूरचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात तो  तायक्वांदो खेळताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये तो तायक्वांदोचा ड्रेस परिधान करुन प्रतिस्पर्ध्यावर  हल्ला करतोय. तैमूरचा हा तायक्वांदो खेळतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ भरभरुन नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. आत काही लोकांनी तैमूरचं कौतुक केलयं तर काहींनी त्याला ट्रोल करण्याची संधी सोडलेली नाही.

 एका नेटकऱ्याने “ छान खेळतोय”, अशी कमेंट केली आहे. तर एक नेटकऱ्याने “आता तैमूरला राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पाठवायचं का? की सरळ ऑलिम्पिकमध्ये पाठवायचं?”, अशी कमेंट केली आहे. तर " एकानं  हा प्रश्न नोट करुन ठेवा UPSCमध्ये येइल "असं लिहिलय. तर “प्रत्येक वेळी नकारात्मक कमेंट करणं गरजेचं नाही”, अशी कमेंट करत तैमूरचा बचाव केलाय.रविवारी मुंबईत तायक्वांदो खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तैमूरसह बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सने भाग घेतला होता. अभिनेता शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम यानेही खेळात सहभाग घेतला होता , अबरामनं तायक्वांदोमध्ये गोल्ड मेडल मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT