Tamannaah Bhatia Esakal
मनोरंजन

Tamannaah Bhatia: कितीही लपवलं तरीही तमन्नाला अखेर पापाराझींनी बॉयफ्रेंडसोबत पकडलचं! व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Tamannaah Bhatia: बॉलिवूडमध्ये कधी कोण कुणाला डेट करेल काही सांगता येत नाही. नुकतच परिनीती आणि राघव यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरात सुरु असतांनाच दुसरीकडे आणखी एक बॉलिवूड कपल डेट करत असल्याच्या चर्चा बी टाउन मध्ये जोरात सुरु आहे.

गेल्या बऱ्याच दिवसापासून या कपलच्या नावाची चर्चा सुरु आहे ते कपल म्हणजे तमन्ना आणि विजय वर्मा. न्यू इअरच्यावेळी दोघांचा किसींग व्हिडिओ सोशल मिडियावर बराच व्हायरल झाला होता. त्यानंतर या दोघांच्या डेटिंगच्या अफवा जोर धरु लागल्या. त्यानंतर हे कपल बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसल आहे.

मात्र आता या अफवांवर शिक्कामोर्तब झालं आहे. असं काहीस हा व्हिडिओ पाहिल्यानतंर म्हणता येईल.

तमन्ना आणि विजय वर्मा रात्रीच्या जेवणानंतर एकत्र दिसले. त्यांना अशा प्रकारे एकत्र पाहिल्याने डेटिंगच्या बातम्यांवर पुन्हा चर्चा रंगल्या. दोघेही एकत्र खूप आरामात होते, पण त्याचवेळी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते की हे पापाराझी कुठून आले.

हा व्हिडिओ लोकप्रिय पापाराझी मानव मंगलानीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर लोकांकडून खूप कमेंट करत आहेत.

तमन्ना आणि विजय पहिल्यांदाच एकत्र दिसत नाहीत. याआधीही ते बऱ्याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. यामुळेच त्यांच्या डेटिंगच्या अफवा खूप जोरात सुरु होत्या. मात्र अजूनही दोघांपैकी कोणीही अधिकृतपणे या बातमीची पुष्टी केली नाही. आता या लेट नाईट डिनरचा व्हिडीओ सोशल मिडियावर वाऱ्यासारखा पसरल्याने दोघेही खरोखरच एकत्र आहेत. त्यामुळे त्याचे चाहते खुप खुश आहेत ते या दोघांना शुभेच्छा देत आहे.

यापुर्वी जेव्हा तमन्नाला विजय सोबतच्या नात्याबद्दल विचारलं तेव्हा तिने शेवटी आपले म्हणणे नेटकऱ्यांना सांगितले आहे. ती म्हणते, कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. अशा अफवा पसरत असतातच. त्या प्रत्येकावर मी काही बोलू शकत नाही. मी काही नेटकऱ्यांच्या अफवांवर प्रतिक्रिया देण्यास बांधील नाही. अशी प्रतिक्रिया तमन्नानं दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders: 5 कोटींमध्ये संपला दशकभराचा वाद! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबईतील फ्लॅटही सोडावा लागणार

Monsoon Rain Formation : 'मॉन्सून'चा पाऊस ढगांत कसा तयार होतो? पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे आता होणार अधिक सोपे

Maharashtra Pilgrims Accident : तीर्थयात्रा ठरली अखेरची! महाराष्ट्राच्या भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; २ ठार, ३५ जखमी

Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही

Rohit Pawar: पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल रोहित पवारांची दिलगिरी; आगामी कालावधीत सर्वांनी एकत्र येणे गरजेच!

SCROLL FOR NEXT