Tamil actor Vishal's near-death experience on film set Google
मनोरंजन

Viral Video: 'त्याला मृत्यूनं गाठलंच होतं तितक्यात...', सिनेमाच्या सेटवर तामिळ अभिनेत्यासोबत जीवघेणा प्रसंग

अभिनेता-निर्मात विशाल रेड्डीन स्वतः सेटवरचा तो भयानक प्रसंग दाखवणारा व्हिडीओ त्याच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

VIral Video: साऊथ सिनेमाचा चर्चित अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डीसोबत एक मोठा जीवघेणा प्रसंग नुकताच सिनेमाच्या सेटवर शूटिंग दरम्यान घडला. तो प्रसंग पाहून पाहणाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

मृत्यूनं अभिनेत्याला जवळपास गाठलंच होतं..पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. सध्या त्या सेटवरील अपघाताचा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण बहुधा हेच म्हणतोय.

विशाल रेड्डी त्याच्या 'मार्क एंटनी' सिनेमाचं दिग्दर्शन करत होता तेव्हाच सेटवर हा मोठा अपघात होता होता राहिला. त्यानं स्वतः याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

बोललं जातं की,सीन ज्याप्रमाणे शूट करण्याचे योजिले होते त्यानुसार ट्रकला भिंत तोडून झाल्यावर तिथे थांबायचे होते,पण काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि ट्रकचा ब्रेकच लागला नाही आणि ट्रकचा ताबा सुटला.

यामुळे संपूर्ण सेटवर लोक सैरावैरा पळू लागले. योग्य वेळी त्या भरकटलेल्या ट्रकवर नजर पडली आणि प्रसंगावधान राखून सर्वजण लांब झाले.

विशाल जोरदार वेगानं धावणाऱ्या त्या ट्रकपासून काही सेकंदाच्या अंतरावरच उभा होता..हे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. विशाल सोबत ज्युनिअर आर्टिस्टही होता.

विशाल कृष्ण रेड्डीनं या घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्वीटर हॅंडलवर शेअर करत लिहिलं आहे की, ''बस्स...काही सेकंदाच्या अंतरावर माझं आयुष्य वाचलं. मी देवाचा आभारी आहे. या घटनेमुळे मी सुन्न झालो आहे. अर्थात आता सगळं ठीक आहे आणि मी पुन्हा शूटिंग सुरू केलं आहे''.

विशालचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. ते आपल्या आवडत्या स्टार्ससाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.

देवाचे आभार मानताना दिसत आहेत. 'मार्क एंटनी' सिनेमात विशाल व्यतिरिक्त रितु वर्मा, अभिनय आणि एसजे सूर्या दिसणार आहेत ज्याचं दिग्दर्शन रविचंद्रन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT