tandav 
मनोरंजन

‘तांडव’चा टीझर रिलीज, सैफअली खानच्या डॅशिंग अंदाजावर चाहते फिदा

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री डिम्पल कपाडिया, तिग्मांशु धुलिया, सुनील ग्रोवर स्टारर आगामी ‘तांडव’ या वेबसिरीजचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ही सीरिज ऍमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ‘तांडव’ वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने याची निर्मिती केली आहे.१ मिनिट २० सेकंदाच्या या टिझरमध्ये सैफअली खानचा धमाकेदार अंदाज दिसून येतोय. 

‘तांडव’ या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. टीझरमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारत असल्याचं दिसतंय. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते खूपंच उत्सुक आहेत. तांडव या वेबसिरीजचे एकुण नऊ भाग असणार आहेत. त्यामुळे अर्थातच ही सिरीज उत्सुकता वाढवण्यात यशस्वी ठरेल यात शंका नाही.  

मुख्य कलाकारांमध्ये सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार झळकतील.

 'तांडव' या वेबसिरीजच्या माध्यमातून अभिनेत्री डिंपल कपाडिया डिजीटल आणि अली अब्बास जफर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसंच या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना सरप्राईज देणारा असेल. ‘तांडव’ ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

tandav teaser released watch saif ali khan powerful avatar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT