Tanhaji The Unsung Warrior box office collection soon to hit 200 crores  
मनोरंजन

'तान्हाजी' चा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ, 200 कोटींकडे वाटचाल

वृत्तसंस्था

मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार. झालंही तसंच! जाणून घ्या आठव्या दिवशी तान्हाजीने किती कोटींची कमाई केली आहे.

चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवस झाले असून अजुनही तान्हाजीची हवा कायम आहे. सर्वच चित्रपटांवर तो भारी पडलाय आणि सुपरहिट ठरला आहे. विशेष म्हणजे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेला हा चित्रपट 100 कोटीं पार केलेल्या चित्रपटांच्या यादीत  गेला आहे. 'तान्हाजी' ने 100 कोटींचा पल्ला गाठत प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे. 

तान्हाजीने आतापर्यंत जवळपास 128.97 कोटींची कमाई केली आहे.बॉक्सऑफिसवर या सिनेमाने आपला करिश्मा दाखविला आहे. शिवाय या क्षेत्रातील तज्ञांच्या मते लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडाही गाठू शकतो. हा चित्रपट 150 कोटींच्या बजेटमध्य़े तयार झाला होता. लवकरच तो बजेटची किंमत भरुन काढून 200 कोटी हिट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

या चित्रपटाचं देशभरात जंगी स्वागत करण्यात आलं. कुठे अजयच्या तानाजीच्या रूपातल्या पुतळ्याला हार घालण्यात आले तर कुठे फटाके फोडून तानाजीला सुरवात कण्यात आली. शिवाजी महाराज व तानाजीवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी तानाजी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. चित्रपट जाणकारांच्या मते तानाजी पहिल्याच दिवशी 10 करोडची कमाई करेल. पण हे सगळे अंदाज धुडकावत तानाजीने पहिल्याच दिवशी 15 कोटींचा गल्ला जमावला होता. रविवारी तर या चित्रपटाने तब्बल 26 कोटींची कमाई केली आहे. सेच ओम राऊतने दिग्दर्शनाच्या बाबतीत सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तसेच काजोल-अजय यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर झळकली असल्याने प्रेक्षक आनंदी आहेत. सैफ अली खानचा अभिनय प्रेक्षकांना आवडतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Poland Defense: पोलंडमध्ये फ्रान्सची लढाऊ विमाने तैनात

Navaratri 2025: यंदा नवरात्रीत क्लासी ‘स्टाइल स्टेटमेंट’ महिलांना खुणावताहेत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या अन् घागरा

Chinchwad Crime : चिंचवडमध्ये टेम्पो चालकाला लुटले; गुन्हेगारांना अटक

हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

SCROLL FOR NEXT