Tanushree Dutta claims multiple attempts were made to kill her post MeToo, again involved nana patekar name
Tanushree Dutta claims multiple attempts were made to kill her post MeToo, again involved nana patekar name Google
मनोरंजन

'Mee Too नंतर मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न..',तनुश्रीचा नाना पाटेकरांवर पुन्हा निशाणा

प्रणाली मोरे

Tanushree Dutta: तनुश्री दत्तानेपुन्हा एका नव्यानं दिलेल्या मुलाखतीत मी टू मोहिम सुरू केल्यानंतर आपल्या विष देऊन मारण्याचा प्रयत्न अनेकदा केला गेला, माझा उज्जैन इथं झालेला अपघात हा देखील घडवून आणलेला..कारण मी लोकांसमोर येऊन माझ्यासोबत घडलेला गैरप्रकार सांगितला... असा खळबळजनक आरोप केला आहे. तिन मागच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की,तिच्या घरी जी बाई नव्यानं कामाला लागली होती...ती खरंतर माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती असं म्हणाली होती. ती बाई घरी कामाला लागल्यानंतर अनेकदा आपण आजारीच पडायचो असं तनुश्री म्हणाली होती. तेव्हा तिला सारखी शंका यायची की आपल्याला पिण्याच्या पाण्यात काही मिसळून दिलं जातंय. (Tanushree Dutta claims multiple attempts were made to kill her post MeToo, again involved nana patekar name)

हे सगळं प्रकरण सुरु झालं तेव्हा, जेव्हा तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांनी 'हॉर्न ओके प्लीज' शूटिंगच्या सेटवर आपल्यासोबत गैरवर्तनं केलं याविरोधात सर्व जगासमोर आवाज उठवल्यानंतर. अर्थात तनुश्रीच्या या आरोपांना मान्य न करत नाना पाटेकरांनी त्यांना धुडकावून याआधीच लावलं आहे.

या वर्षाच्या जुलै महिन्यात तनुश्रीनं सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की,''माझ्यासोबत जे काही आता चुकीचं घडत आहे,मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे याला कारणीभूत आहेत माझ्याशी गैरवर्तन करणारे नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफिया जे नाना पाटेकर यांच्याच मित्रपरिवारातून आहेत. कोण आहेत हे बॉलीवूड माफिया? हे तेच लोक आहेत ज्यांची नावं सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सारखी समोर येत होती. जे लोक त्याच्याही आत्महत्येस कारणीभूत आहेत असं बोललं जात होतं''.

''त्यांचे सिनेमे पाहू नका,त्यांना बॉयकॉट करा. या वाईट विचारांनी बुरसटलेल्या इंडस्ट्रीला संपवून टाकायला हवं. मी अनुभवलंय याच बॉलीवूडच्या काही लोकांनी माझ्याविरोधात उगाचच काहीही चुकीच्या बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांना आणि पी.आर ना आपल्या गाठीशी बांधलंय, माझ्याविरोधात मोहिम राबवायला सांगितलं आहे. अशा या बॉलीवूडकरांना सोडू नका तुम्ही''.

मी टू मोहिम सुरू केल्यानंतर तनुश्री भारतात २०२० साली परत आली. तिला खरंतर बॉलीवूडमध्ये परत यायचं होतं. तिनं तसे प्रयत्न करायलाही सुरुवात केलेली असं तिनं सोशल मीडियावर लिहिलं होतं. ती म्हणाली होती,''मी माझ्या करिअरला पुन्हा सुरू करायचा प्रयत्न करत होती,लोक माझ्यासोबत काम करण्यास तयारही होते,पण या बॉलीवूड माफियांनी माझ्यासाठी सगळं कठीण करून ठेवलं होतं...मला ऑफर येत होत्या,सिनेमाच्या-वेबसिरीजच्या,मी काही प्रोजेक्ट साइनही केले होते,पण नंतर हळूहळू सगळंच हातातून निसटू लागलं. लगेच मी साइन केलेल्या प्रोजेक्टचे निर्माते,दिग्दर्शक मागे हटले..कारणं देऊ लागले...फायनान्सरनी म्हणे मी त्या प्रोजेक्टमध्ये असल्यानं हात वर केले सांगू लागले''.

ती पुढे म्हणाली, ''मी २०२० साली भारतात आली तेव्हापासून माझ्यासोबत हे असं सतत घडत असल्याचा अनुभव घेतेय. लोकांना माझ्याविरोधात एक मेसेज करुन आदेश दिला जातोय,हिच्यासोबत काम करू नका. आणि मग लोक मला टाळतात,त्यांना माझ्यासोबत काम करायचं नाहीय असं सरळ तोंडावर सांगतात. ते बॉलीवूड माफिया माझ्यावर पाळत ठेवून आहेत,आणि त्यांना जसं हवंय तसं माझ्याविरोधात कट करतायत. ते ताकदवान आहेत आणि लोकांना त्यांच्याविरोधात पाऊल उचलून स्वतःवर संकट ओढवून घ्यायचं नाहीय. कोणालाच मला संधी द्यायची नाहीय..''असं देखील तनुश्री आता दिलेल्या मुलाखतीत म्हणाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT