tanushree dutta filed fir against rakhi sawant and made serious allegations to nana patekar SAKAL
मनोरंजन

Tanushree Dutta: तनुश्री दत्ताने राखी सावंत विरुद्ध नोंदवला FIR, नाना पाटेकरांवरही टिका करत म्हणाली, "समाजसेवा करुन त्यांनी..."

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर FIR नोंदवत नाना पाटेकरांवरही गंभीर टिका केली

Devendra Jadhav

Tanushree Dutta: तनुश्री दत्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तनुश्रीने काही दिवसांपुर्वी राखी सावंतचा पती आदिल खान सोबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन राखी सावंतवर गंभीर आरोप करुन आदिलला सपोर्ट केला.

आता तनुश्रीने राखी सावंतविरुद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात FIR नोंदवत तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय नाना पाटेकर यांच्यावर टिका केलीय. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

राखी सावंत विरुद्ध नोंदवला FIR

दोन दिवसांपूर्वी तनुश्री दत्ता हिने वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. अखेरीस ओशिवरा पोलिसांनी तनुश्री दत्ता हीची राखी सावंत विरोधातील तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला

राखी सावंत विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तनुश्री दत्ताने मीडियाशी संवाद साधला याशिवाय आता पोलीस राखीवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

तनुश्री म्हणाली, 'हे संपूर्ण प्रकरण 2008 सालचे आहे, जेव्हा राखीला हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले होते. आणि तेव्हापासून तिला माझ्यासोबत समस्या होत्या. त्यानंतर माझ्यासोबत वाद निर्माण केल्यानंतर निर्मात्यांनी राखीला परत सिनेमात घेतलं."

"यानंतर, 2018 मध्ये MeToo चळवळीदरम्यान, मला राखीमुळे खूप भावनिक आघात सहन करावे लागले. ती माझ्या विरोधात जे काही बोलली त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. आता तिच्या चुकीच्या माफी नाही."

तनुश्री पुढे म्हणाली, "राखीमुळे निर्मात्यांनी माझे सर्व चेक बाऊन्स केले. निर्मात्यांनी अशी चुकीची कामे करू नयेत असे मी म्हणेन. त्यावेळी मी सुप्रसिद्ध कलाकार होते. मी चांगले चित्रपट केले होते. आशिक बनाया आपने हा चित्रपटही गाजला होता. अशा परिस्थितीत ते गाणे रिलीज झाले असते तर मला आणखी काम मिळाले असते. निर्मात्याचेही भले झाले असते. पण या सर्व प्रकरणात मला खूप भावनिक आघात सहन करावा लागला."

तनुश्री दत्ताने तिच्या संभाषणात नाना पाटेकरांचा उल्लेख केला आणि म्हणाली, 'नाना पाटेकरांनी स्वतःची अशी प्रतिमा निर्माण केली आहे की ते समाजसेवा करतात. मात्र ते केवळ पत्रकार परिषदेत समाजसेवेबद्दल बोलतात आणि पुरावे कधीच दाखवत नाहीत. चांगला माणूस तोच असतो जो आपल्या कुटुंबासोबत राहतो. अभिनेत्रींशी संबंध जोडणे किंवा त्यांच्यासोबत अफेअर असणे हे चांगल्या माणसाचे लक्षण नाही. नाना पाटेकर यांचे त्यांच्या कुटुंबियांशी संबंध चांगले नाहीत हे सर्वांनाच माहीत आहे. ते पत्नी आणि मुलासोबत राहत नाही. इंडस्ट्रीत त्यांनी त्यांच्या मुलालाही साथ दिली नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT