Apurva Movie: Esakal
मनोरंजन

Apurva: 'अपूर्वा'साठी ताराची प्रचंड मेहनत! आठवडाभर केली नाही अंघोळ ; झाली होती अशी अवस्था

Vaishali Patil

Apurva Movie: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारियाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. काही दिवसांपुर्वी तारा कार्तिक आर्यनसोबत डिनर डेटला दिसली होती. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशीपच्या खुप अफवा पसरल्या मात्र आता तारा तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. तारा आता 'अपूर्वा' या चित्रपटात दिसणार आहे.

नुकताच अपूर्वा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ताराचे खुप कौतुक केले. ताराच्या दमदार अभिनयाची भुरळ चाहत्यांना पडली असून ते अपूर्वा या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ताराने तिच्या या चित्रपटाबाबत काही खुलासे केले आहे. ताराने सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करत अपूर्वा बद्दल सांगितले आहे.

तारने चित्रपटाच्या शूटिंगमधील बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत ताराने तिच्या चित्रपटाच्या कहानी बद्दल आणि त्यासाठी तिने घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितले.

ताराने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला अपूर्वाचा खुप अभिमान आहे, कारण मी या चित्रपटाचा प्रत्येक शॉट स्वत: शूट केला आहे. काहीच कारणे दिली नाहीत. जेव्हा आम्ही चित्रीकरण करत होतो तेव्हा मला माझ्यात खुप जास्त ताकद जाणवली जी यापुर्वी कधीच नव्हती. निखिल नागेश भट्ट सरांची मी खूप आभारी आहे.

मला आठवते की मी शुटिंगसाठी मी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अंघोळ केली नाही, त्यामुळे मला खूप घाण वाटत होतं. जसे मला अपेक्षित होतं, मी चिखलात आणि राखेत लोळले आणि मी माझे केस कित्येक आठवड्यांपर्यंत विंचरले नव्हते.

आम्ही पोस्टर शूट केले तेव्हा मी कशी दिसत होतो याची एक झलक शेअर केली आहे. एवढ्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. अवी गोवारीकर तुमच्या दिवसभरातील सर्व मदतीबद्दल धन्यवाद.'

ताराने यासोबत तिचे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिचे खुप कौतुक करत आहेत तर तिच्या अभिनयाला दादही देत आहे. आता प्रेक्षकांना फक्त तिच्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे.

अपूर्वा या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल नागेश भट्ट यांनी केले आहे. तारा सुतारिया चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असून राजपाल यादव, धैर्य करवा, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार तिच्यासोबत काम करत आहे. अपूर्वा हा चित्रपट 15 नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT