Taraja Ramsess Hollywood Actor Stuntman passed away  esakal
मनोरंजन

Taraja Ramsess Passed Away : 'माझा मुलगा अन् दोन नातू गेले'! आईचा शोक, 'ब्लॅक पँथर' च्या स्टंटमॅननं घेतला अखेरचा श्वास!

हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Taraja Ramsess Hollywood Actor Stuntman passed away : हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स आणि ब्लॅक पँथरचा स्टंटमॅन ताराजा रामसेस याचे निधन झाल आहे. अटलांटा येथे झालेल्या अपघातात त्याची दोन मुलंही मृत्यूमुखी पडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बातमीनं हॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

तराजाच्या या बातमीनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आणि त्याच्या दोन मुलांच्या अपघाताची बातमी समोर आल्यानं सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. एक मुलगा रुग्णालयात उपचार घेतो आहे. तो दहा वर्षांचा आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. अटलांटामध्ये तराजाच्या वाहनाचा अपघात झाला. त्यात त्याची तीन मुलंही मृत्यूमुखी पडली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची कार त्या रस्त्यावरील नादुरुस्त ट्रॅक्टरला धडकल्याचे सांगण्यात येत आहे.

४१ वर्षीय तराजासोबत त्याची १३ वर्षांची मुलगी आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची बातमी तराजा रामसेसची आई अकीली रामसेस यांनी सोशल मीडियावर शेयर केली आहे. त्यांनी इंस्टावरुन शेयर केलेल्या या पोस्टमध्ये तराजाचा मुलांसमवेतचा फोटोचा समावेश आहे. चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तो फोटो शेयर करताना त्यांनी लिहिले आहे की, माझा सुंदर, प्रेमळ आणि तितकाच हुशार मुलगा तराता आणि माझी नातवंडं यांचा अपघात झाला. मी यात कोसळून पडले आहे. मी खूप धक्क्यात आहे. तराजा यांच्या आईनं शेयर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तराजाच्या या बातमीनं पूर्ण हॉलीवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

रामसेसच्या बाबत आणखी माहिती सांगायची झाल्यास त्याला ब्लॅक पँथरमधील अॅक्शन स्टंटसाठी ओळखले जाते. ती त्याची मोठी ओळख होती. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये त्यानं जे काम केले त्यासाठी त्याची लोकप्रियता होती. तो चर्चेत आला होता. त्याचा चाहतावर्गही मोठा होता. त्यानं अॅव्हेंजर्स - एंडगेम, ब्लॅक पँथर - वकंडा फॉरएव्हर सारख्या चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT