Babita alias munmun dutta Team esakal
मनोरंजन

'तारक मेहताच्या बबिताला अटक करा, जातीवाचक शब्द वापरले'

यासंबंधीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री मुनमुन दत्ता जी मालिकेमध्ये बबिता नावाची भूमिका करते. तिचा एका व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. नेटक-यांचे असे म्हणणे होते की, त्या व्हिडिओमध्ये बबितानं काही जातीवाचक शब्दांचा वापर करुन एका समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यामुळे बबिताला अटक करा. यासंबंधीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. त्या मालिकेचा टीआरपी इतर मालिकांपेक्षा अधिक आहे. सोशल मीडियावरही या मालिकेची चर्चा असते. त्यातील पात्रं, संवाद याविषयी सर्वांना उत्सुकता आहे. नेहमी चर्चेत असणारी ही मालिका त्यातील कलावंताच्या वेगवेगळ्या भूमिकांविषयीही चर्चेत असते. असे दिसून आले आहे. यापूर्वीही बबिताची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता अनेकांच्या टीकेचा विषय ठरली होती. आताही तिच्यावर नेटक-यांनी टीका केली आहे.

गेल्या अकरा वर्षांहून अधिक काळ तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रसिध्द आहे. लहानांपासून सर्वांमध्ये तिची लोकप्रियता कायम आहे. मात्र काही दिवसांपासून मालिकेतील प्रसिध्द अभिनेत्री मुनमुन दत्ता उर्फ बबिता आता चर्चेत आली आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे तिनं एका समुदायाबाबत वापलेले अयोग्य शब्द त्यामुळे तिच्यावर टीका होत आहे. हे प्रकरण इतके टोकाला गेले आहे की त्यामुळे तिला अटक करावी अशी मागणी नेटक-यांनी केली आहे.

यासगळ्या प्रकरणावर बबितानंही आपली बाजू मांडली आहे. तिनं म्हटलं आहे की, माझा जो एक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. त्यात माझ्याकडून चूकीनं काही शब्द वापरले गेले. मला कुणाच्याही भावनांना दुखवायचे नव्हते. मात्र जे झालं त्यात जाणीवपूर्वक असे काहीही नव्हते. हे मला सांगायचे आहे. मी त्यासाठी सर्वांची माफी मागते असेही तिनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT