tarak mehta fame Dilip Joshi shares he didn’t get any work after Hum Aapke Hain Koun rejection struggle bad days nsa95 sakal
मनोरंजन

Dilip Joshi: 'हम आपके है कौन' केला आणि मला वाटलं आपलं नशीब पालटलं; पण प्रत्यक्षात झालं उलटंच..

'जेठालाल' साकारणाऱ्या दिलीप जोशी यांचा खडतर प्रवास..

नीलेश अडसूळ

Dilip Joshi: गेली १४ वर्षे निखळ मनोरंजन करणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला आपल्या घरातला वाटू लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'जेठालाल'.

हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हिंदी आणि गुजराती भाषेत अनेक भूमिका केल्या आहेत. ते स्वतः एक रंगकर्मी असून गुजराती रंगभूमीवर त्यांचे भरीव योगदान आहे. पण तारक मेहता मालिकेतून ते घराघरात पोहोचले.

त्यांची 'हम आपके है कोन' या चित्रपटातील भूमिका ही प्रचंड गाजली आणि लोकांच्या लक्षात ही राहिली. या चित्रपटानंतर आपलं आता नशीबच पालटलं असं दिलीप जोशी यानं वाटलं होतं. कारण तयानंतर झालं सगळं उलटच.. त्यांचा खरा संघर्ष त्या चित्रपटानंतरच सुरू झाला. त्याच विषयी ते एका मुलाखतीत बोलले आहेत.

(tarak mehta fame Dilip Joshi shares he didn’t get any work after Hum Aapke Hain Koun rejection struggle bad days )

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना दिलीप यांनी आपल्या संघर्षाच्या काळाबद्दल माहीती दिली. यावेळी त्यांनी 'हम आपके है कोन' या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, ''१९९२ साली माझी मुलगी नियतीचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या बँक खात्यात केवळ २५००० रुपये होते, त्यापैकी १३ ते १५ हजार हे हॉस्पिटलचे बील देण्यात गेले. त्यावेळी मी फक्त नाटक करत होतो ज्यासाठी मला प्रत्येक शोमागे ४०० ते ४५० रुपये मिळायचे.''

''त्यावेळी मला 'हम आपके है कौन'सारखा चित्रपट मिळाला अन् मला वाटलं, आता माझा स्ट्रगल संपला. आता आपलं नशीब पालटलं.. आता खरे चांगले दिवस येतील. पण तसं काहीच झालं नाही. या चित्रपटानंतर सगळं उलटच घडलं. चित्रपट सुपरहीट झाला पण माझी अवस्था मात्र बिकट झाली. त्या चित्रपटानंतर मला काम मिळायचं बंद झालं.''असं ते या मुलाखतीत म्हणाले.

दिलीप जोशी हे उत्तम रंगकर्मी आहेत. गेली अनेक वर्ष ते नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत. 'हम आपके है कोन' नंतर जेव्हा त्यांना काम मिळत नव्हतं तेव्हा त्यांनी मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा ही निर्णय घेतला होता. पण त्यानंतर त्यांनी काही छोट्या मोठ्या भूमिक केल्या आणि 2008 मध्ये त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्यांचं नशीब पालटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT