मनोरंजन

'माझ्या लग्नासाठी आता तुम्हीच प्रयत्न करा' पोपटलालनं...

टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे ती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा ही आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे ती मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा ही आहे. दशकाहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांना मनमुराद हसवलं आहे. त्यांचे मनोरंजन केले आहे. मालिकेतील कलाकार हे चाहत्यांच्या नेहमी चर्चेचा विषय असतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेतील प्रमुख कलाकार जेठालाल यांच्या मुलीच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्या लग्नाला दयाबेन उपस्थित राहणार की नाही यावरुन चाहत्यांनी जेठालाल यांना प्रश्न विचारले आहे. सध्या आणखी एका कलाकाराची चर्चा रंगली आहे.

तारक मेहताप्रमाणे कौन बनेगा करोडपतीनं देखील प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वीच या रियॅलिटी शोनं एक हजार एपिसोड पूर्ण केले आहेत. महानायक अमिताभ बच्चन शो चे सुत्रसंचालन करतात. नुकतचं या शो मध्ये तारक मेहतामधील लोकप्रिय स्टारकास्टनं सहभाग घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जेठालाल पासून पोपटलाल उर्फ श्याम पाठ यांचा समावेश आहे. यावेळी अमिताभ यांच्यासमोर तारक मेहतामधील तब्बल 21 कलाकार सहभागी होणार आहेत. आणि बिग त्यांच्यासोबत कौन बनेगा करोडपती खेळणार आहे. सध्या या एपिसोडचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बिग बी यांनी पोपटलाल यांना लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता.

पोपटलाल यांनी बिग बींच्या त्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की, आता तुम्हीच माझे लग्न करुन द्या. मला सगळा स्वयंपाक येतो, मी घरातली सगळी काम करु शकतो. पोपटलालचं हे उत्तर ऐकल्यानंतर बिग बी यांना हसु आवरत नाही. त्यावर बिग बी त्याला उत्तर देतात की, शाब्बास.. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रोमोला आतापर्यत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel Tension: हॉर्मुज संकटाचा फटका! गाडी खरेदी आता आणखी महाग होणार; ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार

Pune News : ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश रांका यांचे निधन; पुणे व्यापारी क्षेत्रात शोककळा

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

SCROLL FOR NEXT