Tarak Mehta Ka Ooltah Chashma artist apologize to MNS on dispute of Hindi Dialogue
Tarak Mehta Ka Ooltah Chashma artist apologize to MNS on dispute of Hindi Dialogue  
मनोरंजन

मोदींनी हात जोडून मागितली राज ठाकरेंची माफी

वृत्तसंस्था

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील वयस्कर व्यक्तिरेखा चंपक चाचा यांच्या एका डायलॉगमुळे हिंदी-मराठी असा वाद सुरू झाला होता. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. आज (ता. ५) मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी आणि कलाकार अमित भट्ट यांनी मनसे कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितली आहे. 

'तारक'मध्ये एक चंपक चाचांचा एक डायलॉग होता, की 'हिंदी ही मुंबईची भाषा आहे.' या डायलॉगवर मनसेने आक्षेप घेतला होता. तर हिंदी नाही तर मराठी ही मुंबईची भाषा आहे असे मनसेचे म्हणणे होते. यावर निर्मात्यांनी व कलाकारांनी माफी मागावी अशी मागणी मनसेने केली होती, त्यामुळे अमित भट्ट यांनी लिखित स्वरूपात मनसेची माफी मागितली आहे. यात त्यांनी म्हणले आहे की, ते समोर आलेली स्क्रीप्ट वाचतात व लेखक जे सांगतात तेच डयलॉग म्हणावे लागतात. मी मराठी भाषेचा आदर करतो व मालिकेत जो डयलॉग माझ्या तोंडून गेला यासाठी मी क्षमा मागतो, असे त्यांनी लिखित स्वरूपात सांगितले. 

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत हिंदीत सुविचार लिहिण्यावरून वाद सुरू होता. तेव्हा हा डयलॉग बोलला गेला होता. यावरच मनसेने आक्षेप घेतला व माफीची मागणी केली. मनसे नेते अमेय खोपकर यांनी आक्षेप घेत ट्विट केले होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT