TDM Marathi Movie Trailer Bhaurao Karhade Director  esakal
मनोरंजन

TDM Trailer : 'लाथ मारशील तिथं पाणी काढशील लेका तू..' भाऊचा नवा धक्का!

सोशल मीडियावर भाऊच्या टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. आता प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे.

युगंधर ताजणे

TDM Marathi Movie Trailer Bhaurao Karhade Director : मराठी चित्रपटांमध्ये आपल्या चित्रपटांनी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये भाऊराव कऱ्हाडेचे नाव घ्यावे लागले. त्याच्या यापूर्वीच्या ख्वाडा, बबन या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या टीडीएम नावाच्या चित्रपटाचे चाहत्यांना वेध लागले आहेत.

सोशल मीडियावर भाऊच्या टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. आता प्रदर्शित झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक वाट पाहत होते. चाहत्यांनी भाऊचे कौतूक केले आहे. त्याच्या या चित्रपटासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. वेगळे विषय, त्याची प्रभावी मांडणी आणि सादरीकरण यासाठी भाऊच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - पाठ्यपुस्तकांत वह्यांची घुसखोरी

टीडीएमच्या ट्रेलरमधून त्यात भूमिका करणारे कलाकार, चित्रपटाचा विषय याविषयी प्रेक्षकांनी काही अंदाज बांधले आहेत. नवीन कलाकारांना घेऊन भाऊच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यापूर्वी या चित्रपटातील प्रदर्शित झालेल्या गाण्यांना देखील श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'टीडीएम' चित्रपटातील नवखे चेहऱ्यांविषयी सांगायचे झाल्यास त्यामध्ये अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्याकडे आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

TDM Trailer

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT