TDM Movie  esakal
मनोरंजन

TDM Movie : प्रमोशनसाठीपण लागतो वशिला? 'चला हवा येऊ द्या नं TDM ला शेवटपर्यंत संधी दिलीच नाही!

ख्वाडा, बबन आणि आता टीडीएम सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टीडीएमवरुन सध्या चर्चा सुरु आहे.

युगंधर ताजणे

TDM Movie : ख्वाडा, बबन आणि आता टीडीएम सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टीडीएमवरुन सध्या चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर देखील हा चित्रपट आणि त्यावरुन सुरु असणारा वाद याच्याविषयी उलट सुलट प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत.

आपल्या चित्रपटाला पुरेशा प्रमाणात स्क्रिन्स न मिळाल्यानं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मराठी चित्रपटांच्या वाट्याला काय दिवस आले आहेत, मराठी चित्रपटांना पुरेशा प्रमाणात स्क्रिन्सच मिळत नसल्याची खंत कऱ्हाडे यांनी व्यक्त करताना यापुढे आपण चित्रपट तयार करायचा की नाही याचा गांभीर्यानं विचार करु असे म्हटले होते. यावेळी त्यांच्या पूर्ण टीमनं याविषयी सोशल मीडियावर स्क्रिन्स न मिळाल्यानं नाराजी बोलून दाखवली होती.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता भाऊराव कऱ्हाडे यांची आणखी एक वेगळी प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये त्यांनी टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्या विषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भाऊ यांनी एका मुलाखतीमध्ये चला हवा येऊ द्या वर थेट टीका केली आहे. आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आम्ही त्यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. असे भाऊराव यांनी म्हटले आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे प्रमोशन केले जाते. आता हा कार्यक्रम त्यासाठीच ओळखला जात आहे.

चला हवा येऊ द्या च्या मेकर्सनं टीडीएमच्या टीमला नाकारल्यानं प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. भाऊराव म्हणाले, मला ज्यावेळी ख्वाडासाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळालं होतं तेव्हा त्यांनी बोलावलं होतं. त्यानंतर मला ते बबनच्यावेळी बोलावतील असे वाटले होते पण तसे झाले नाही. आता टीडीएमच्यावेळी मी चला हवा येऊ दया च्या मेकर्सना विनंती केली होती. पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. दीड महिन्यांपासून मी त्यांच्या संपर्कात होतो मला त्यांनी बोलावले नाही. अशी प्रतिक्रिया कऱ्हाडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT