Majhya navryachi bayko team 
मनोरंजन

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेच्या टीमची गोव्यात धमाल, पाहा फोटो

सकाळ ऑनलाइन

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवटचा टप्पा सुरु असताना त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी ट्रिपचं आयोजन केलं. अभिनेत्री अनिता दाते केळकर, अभिजीत खांडकेकर, अदिती द्रविड, अद्वैत दादरकर आणि इतर काही कलाकार गोव्याला फिरायला गेले आहेत. या ट्रिपचे फोटो या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. २०१६ मध्ये ही मालिका सुरु झाली होती. तेव्हापासून यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. शनाया, गुरुनाथ सुभेदार आणि राधिका या पात्रांवरून अनेक मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

या मालिकेचा शेवटचा एपिसोड ७ मार्च रोजी प्रसारित होणार आहे. बऱ्याच काळापर्यंत ही मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानी होती. या मालिकेतील शनायाची भूमिका चांगलीच गाजली. सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने ही भूमिका साकारली होती. तिच्यानंतर इशा केसकरची शनाया म्हणून एंट्री झाली. काही काळानंतर पुन्हा एकदा रसिकाने मालिकेत पुनरागमन केलं. भूमिका बदलल्यानंतरही शनायाची क्रेझ नेटकऱ्यांमध्ये तशीच होती. 

मालिकेच्या कथानकात नंतर काही खास वळण येत नसल्याने त्याच्या टीआरपीत घसरण होत गेली. अखेर आता निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यातील कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहेत. सेटवरील विविध फोटो, व्हिडीओ हे कलाकार चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT