the team of 'Hanuman' donated 14 lakhs amount from the proceeds to the Ayodhya Ram Temple SAKAL
मनोरंजन

Hanuman Movie: अयोध्या राम मंदिरासाठी 'हनुमान'च्या टीमने कमाईतून इतकी रक्कम केली दान

'हनुमान'च्या टीमने कमाईतून मोठी रक्कम राम मंदिराला दान करण्याचा निर्णय घेतलाय

Devendra Jadhav

Hanuman Movie: सध्या देशात अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचा चांगलाच माहोल आहे. तमाम भारतवासी अयोध्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

याच पार्श्वभूमीवर नुकत्याच रिलीज झालेल्या 'हनुमान' सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी खास निर्णय घेतलाय. 'हनुमान'च्या तिकीटातून मिळालेली रक्कम प्रशांत यांनी राम मंदिर ट्रस्टला दान करण्याचा निर्णय घेतलाय.

'हनुमान'च्या टीमने या चित्रपटाच्या विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटाचे ५ रुपये अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी दान केले जातील, असे यापूर्वी सांगितले होते. आता प्रशांत वर्मा यांनी राम मंदिरात दान करण्याबाबत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.

हनुमानचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा म्हणतात की, त्यांनी चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईतून 14 लाख रुपये राम मंदिर ट्रस्टला दान केले.

प्रशांत वर्मा पुढे म्हणाले, "आमच्या निर्मात्याने राम मंदिर बांधल्याबद्दल ऐकले, तेव्हा हा चित्रपट मोठा हिट होईल आणि पैसे कमावतील की नाही याची पर्वा न करता, त्यांनी चित्रपटासाठी विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटातून पाच रुपये दान करण्याचा निर्णय घेतला. पण आता चित्रपटाने चांगली कमाई केल्याबद्दल पहिल्या दिवसाच्या कमाईतून मंदिराला सुमारे 14 लाख रुपये दान करण्यात आले."

'हनुमान' ला मिळालेला प्रतिसाद बघता दिग्दर्शक प्रशांतने खुलासा केला की, "प्रेक्षक पहिल्या चित्रपटाला स्वीकारतात की नाही याची आम्ही वाट पाहत होतो. आणि आता मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही लवकरच 'जय हनुमान'च्या म्हणजेच सिनेमाच्या सीक्वेलचं काम करु."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT