tejashri pradhan new marathi serial on star pravah with shubhangi gokhale marathi medium SAKAL
मनोरंजन

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची नवी मालिका.. काय आहे मालिकेचं नाव? कधीपासुन सुरु होणार? जाणुन घ्या

तेजश्रीची नव्या मालिकेत कधी दिसणार, अशी तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर उत्सुकता संपली आहे

Devendra Jadhav

Tejashri Pradhan New Serial News: तेजश्री प्रधान ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. तेजश्रीला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधुन पाहिलंय.

तेजश्रीने होणार सुन मी या घरची मालिकेत साकारलेली जान्हवी असो किंवा अग्गंबाई सासुबाई मालिकेत साकारलेली शुभ्रा असो.

तेजश्रीच्या प्रत्येक भुमिकांमधुन चाहत्यांनी पसंत केलंय. आता तेजश्रीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. तेजश्री नव्या मालिकेतुन चाहत्यांच्या भेटीला येतेय.

(tejashri pradhan new marathi serial on star pravah)

तेजश्रीची नवी मालिका

तेजश्रीने स्टार प्रवाहच्या सोशल मिडीया पेजवरुन या नव्या मालिकेविषयी घोषणा केलीय. तेजश्री व्हिडीओ शेअर करुन म्हणते.. "आपली मराठी परंपरा, आपला मराठी प्रवाह. येस. बरोब्बर ओळखलं. मी येतेय आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेतून. खास तुमच्या भेटीसाठी

आता मालिकेचं नाव, तारीख, वेळ काय ही सगळी उत्सुकता पूर्ण होणार आमच्या नव्या कोऱ्या मालिकेतून. पण त्यासाठी तुम्ही बघत राहा आपलं स्टार प्रवाह.. असा व्हिडीओ तेजश्रीने शेअर केलाय

हे आहे मालिकेचं नाव, वेळ?

तेजश्रीच्या या मालिकेचं नाव आणि वेळ काय आहे, याची अधिकृत माहिती मिळाली नाहीये. पण एका फॅनने केलेल्या कमेंटनुसार मराठी मिडीयम असं या मालिकेचं नाव आहे. याशिवाय २१ ऑगस्टपासुन रात्री ८ वाजता ही मालिका सुरु होणार आहे, असं या कमेंटवरुन समजतंय.

तेजश्रीने नव्या मालिकेची घोषणा करताच तिच्या चाहत्यांना खुप आनंद झालाय. तेजश्रीच्या या व्हिडीओखाली तिच्या फॅन्सनी कमेंट करुन उत्सुकता दर्शवली आहे.

याशिवाय तिचं अभिनंदन केलंय. एकुणच तेजश्री अग्गंबाई सासुबाई नंतर तेजश्री टी.व्ही. वर मोठ्या भुमिकेत कधी दिसणार याची चाहते वाट बघत होते. अखेर चाहत्यांची उत्सुकता पुर्ण होणार आहे.

नव्या मालिकेत ही अभिनेत्री तेजश्रीची सहकलाकार

तेजश्रीच्या नव्या मालिकेत तिच्यासोबत सहकलाकार कोण असणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. स्टार प्रवाहने जो व्हिडीओ शेअर केलाय त्यानुसार तेजश्रीसोबत या मालिकेत अभिनेत्री शुभांगी गोखले झळकणार आहेत.

यानिमित्ताने तेजश्री आणि शुभांगी गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी दिसणार आहे. तर लवकरच या मालिकेचा प्रोमो आणि इतर तपशील उघड होतीलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT