Tejashri Pradhan and Ashutosh Patki Instagram
मनोरंजन

'माय पार्टनर..'; 'बबड्या'साठी तेजश्री प्रधानची खास पोस्ट

तेजश्रीने पोस्ट केला आशुतोष पत्कीसोबतचा फोटो

स्वाती वेमूल

अनोख्या कथानकामुळे 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका खूप चर्चेत होती. निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरीश ओक, आशुतोष पत्की या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील बबड्या हे पात्र तर चांगलंच गाजलं. सोशल मीडियावर त्यावरून बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते. तर शुभ्रा आणि सोहम ही नवीन जोडीसुद्धा चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. मालिका बंद झाल्यानंतरही हे कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहेत. नुकतंच तेजश्रीने (Tejashri Pradhan) आशुतोषसाठी (Ashutosh Patki) सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. सध्या तिच्या या पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट करत तेजश्रीने लिहिलं, 'कामात, भांडणात, कल्पकतेत, हसण्यात, विनोद करण्यात, गॉसिप करण्यात आणि जवळपास सगळ्याच गोष्टीतील माझ्या पार्टनरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. फक्त चिटींग करण्यात तो अपवाद आहे. कारण जेव्हा मला जंक फूड खायची खूप इच्छा असते, तेव्हा तो मात्र डाएटचं पूर्ण पालन करतो. वाढदिवशीसुद्धा तो ऐकत नाही.' तेजश्रीच्या या पोस्टवर आशुतोषनेही मजेशीर कमेंट केली आहे. 'जोपर्यंत जीन्स फिट बसत नाही तोपर्यंतच ही मजा आहे. पण धन्यवाद आणि याला एक अपवाद आहे, ते म्हणजे 'पिझ्झा'', असं लिहित आशुतोषने हसण्याचे इमोजी पोस्ट केले.

मालिकेच्या शूटिंगदरम्यान तेजश्री आणि आशुतोष यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. दोघांच्या आवडीनिवडीसुद्धा सारख्याच असल्याने मैत्री करण्यासाठी त्यांना फार वेळ लागला नाही. मालिका सध्या बंद झाली असली तरी शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांना अजूनही लक्षात आहे. तेजश्रीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आशुतोषला शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT