Tejasswi Prakash and Karan Kundrra Sakal
मनोरंजन

Tejasswi Karan House: तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे दुबईतील घर पाहून व्हाल चकित

महालासारख्या दिसणाऱ्या या घराची किंमत करोडोंमध्ये सांगितली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत 2 कोटी आहे.

सकाळ डिजिटल टीम

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बिग बॉसचा भाग बनल्यापासून नेहमीच चर्चेत असतात. दोघांच्या फॅन फॉलोइंगचा ग्राफ खूप वर गेला आहे. या दोघांनी नुकतेच दुबईमध्ये स्वतःचे घर विकत घेतले आहे जे एखाद्या महालासारखे दिसते.

महालासारख्या दिसणाऱ्या या घराची किंमत करोडोंमध्ये सांगितली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत 2 कोटी आहे. केवळ दुबईच नाही तर तेजस्वी आणि करणची भारतातही करोडोंची मालमत्ता आहे.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राने इंस्टाग्रामवर स्वतः घराचा व्हिडिओ शेअर केला असून तो खूपच सुंदर दिसत आहे. घरात बनवलेली प्रत्येक छोटी-मोठी वस्तू लक्झरी आहे. या घरात भरपूर रूम्स, उत्तम स्वयंपाकघर, फर्निचर तसेच एक प्रायव्हेट पूल देखील आहे.सामान्य लोक आणि मोठ्या सेलिब्रिटींसह प्रत्येकाचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते.

तेजस्वी प्रकाशने इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये माहिती दिली की, हे तिचे स्वप्नातील घर आहे जे तिने पूर्ण केले आहे.घरातील छोट्या-छोट्या गोष्टी घराची शोभा वाढवतात. तसेच या घरातील इंटीरियर देखील खूप सुंदर आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारे या जोडप्याचे घर खूपच सुंदर दिसत आहे कारण त्यांनी घर अतिशय आलिशान शोपीसने सजवले आहे.

यापूर्वी तेजस्वी प्रकाशने गोव्यात एक अपार्टमेंट खरेदी केले होते. तेजस्वीच्या या यशाबद्दल करण कुंद्राने आनंद व्यक्त केला होता. इतकेच नाही तर काही काळापूर्वी करण कुंद्रा मुंबईत एका आलिशान फ्लॅटचा मालकही बनला होता.वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचवेळी करण कुंद्रा एका पंजाबी चित्रपटात काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शुक्रवारी लग्न, मंगळवारी पुन्हा तुरुंगात जावं लागणार! माजी खासदाराच्या ५२ वर्षीय लेकाला सुप्रीम कोर्टाचा दणका

Latest Marathi News Updates : श्रेय दुसऱ्या कोणाचं नाही तर गरीब मराठ्यांचा आहे - मनोज जरांगे

Ganesh Visarjan 2025: 'काेल्हापूरमध्ये विसर्जन मिरवणुकीतही साउंडमुळे कानठळ्‍या'; शहरातील ४१ मंडळांवर खटले : पदाधिकारी, सिस्टीम मालकांना प्रकरण भोवणार

Asia Cup 2025 मध्ये अर्शदीप सिंग घडवणार इतिहास, आजपर्यंत कोणत्याच भारतीयाला न जमलेला करणार पराक्रम

श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघ

SCROLL FOR NEXT