Tejaswini Pandit, Tejaswini Pandit news, Tejaswini Pandit family, tejaswini pandit struggle SAKAL
मनोरंजन

Tejaswini Pandit Birthday: घराची वीज गेली होती, त्यावेळी लाईट बिल भरण्यासाठी तेजस्विनीने केलं होतं हे काम

तेजस्विनीने प्रचंड स्ट्रगलचा काळ अनुभवला आहे.

Devendra Jadhav

Tejaswini Pandit Birthday News: आज मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा वाढदिवस. तेजस्विनीने आजवर अनेक सिनेमांमधून लोकप्रिय भूमिका साकारल्या.

तेजस्विनीने कधी बोल्ड, बिनधास्त भमिकांमधुन प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. तर कधी रोमँटिक भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रेमात पाडले.

आज कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या तेजस्विनीला एकवेळ अत्यंत हलाखीत दिवस काढावे लागले होते. जाणून घेऊ तेजस्विनीची स्ट्रगल स्टोरी..

(Tejaswini did this work to pay the light bill when the electricity in the house was out)

तेजस्विनीने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. तेजस्विनीच्या कुटुंबावर प्रचंड कर्ज होतं. आणि हे कर्ज फेडण्यासाठी तेजस्विनीच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरात वीज नव्हती. कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्याने आणि लाईट बिल भरायला सुद्धा काही शिल्लक नसल्याने तेजस्विनीच्या कुटुंबाने जवळजवळ पंधरा दिवस मेणबत्तीवर काढले.

घरात स्ट्रगल मोठा होता. तेजस्विनीला घरच्या दुःखद परिस्थीतीची जाणीव होती. त्याच दरम्यान तेजस्विनीने काम करायला सुरुवात केली. तेजस्विनीने एका नाइटवेयर कंपनीत काम केलं.

ही जाहीरात करून जे पैसे आले त्या पैशातून तेजस्विनीने आधी घरातलं लाईट बिल भरलं.. अशाप्रकारे तेजस्विनीने प्रचंड स्ट्रगलचा काळ अनुभवला आहे.

तेजस्विनी पंडितचे चाहते महाराष्ट्रभरात आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही अनेकजण वेडे आहेत. सध्या ती अभिनेत्री आणि निर्माती अशा दोन्ही भूमिकांमध्ये आहे.

काही दिवसांपूर्वीच तिची अथांग ही वेब सिरिज येऊन गेली. या सिरिजची बरीच चर्चा झाली. सध्या ती विविध प्रोजेक्ट वर काम करत आहे. तेजस्विनीच्या कामासोबतच तिचे वैयक्तिक आयुष्य हा देखील एक चर्चेचा विषय राहिला आहे.

तेजस्विनीचे 2012 मध्ये लग्न झाले पण काही वर्षातच तिने घटस्फोट घेतला. सध्या ती सिंगल असून तिच्या आयुष्यात सध्या तरी कोणी नाहीये.

तेजस्विनीची आई ज्योतो सुद्धा मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तेजस्विनी सुद्धा मनोरंजन विश्वात यशस्वी कामगिरी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT