Tejaswini Pandit shared post about adipurush movie and her role shurpanakha sakal
मनोरंजन

Tejaswini Pandit: इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये.. 'आदिपुरुष' रिलीज होताच तेजस्विनीची सूचक पोस्ट..

'आदिपुरुष' चित्रपटात अभिनेत्री तेजस्विनी पंडितही महत्वाच्या भूमिकेत आहे.

नीलेश अडसूळ

गेली काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडलेला 'आदिपुरुष' सिनेमा अखेर प्रदर्शित झाला आहे. आज संपूर्ण भारतात 'आदिपुरुष' चीच चर्चा आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी लोक पहाटेपासूनच तयार होते.

'आदिपुरुष'ने स्वतःची वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. आधी टीकेचा धनी झालेला हा चित्रपट आज लोकांना भावतो आहे. त्यामुळे चित्रपटाच्या ओपनिंगलाच आज जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका प्रभासने केलीय तर सीतेची भूमिका केलीय. तर लक्ष्मणच्या भूमिकेत आहे सनी सिंग. पण मराठी प्रेक्षकांसाठी एक मोठा धक्का होता जेव्हा चित्रपट पाहताना अचानक अभिनेत्री तेजस्विनी पंडित पडद्यावर झळकली.

(Tejaswini Pandit shared post about adipurush movie and her role shurpanakha)

होय हे खरं आहे. तेजस्विनी पंडित देखील 'आदिपुरुष' चित्रपटात आहे. विशेष म्हणजे ती रावणाच्या बहिणीच्या म्हणजेच 'शुर्पणखा'च्या भूमिकेत आहे. तिची ही भूमिका सर्वांनाच चकित करून केली. बॉलीवुडच्या सर्वाधिक बजेट असलेल्या चित्रपटात मराठी अभिनेत्री दिसल्याने तिचं प्रचंड कौतुक होत आहे.

आता अभिनेत्रीने स्वतःच याबाबत एक पोस्ट शेयर केली आहे. आजपर्यंत तेजस्विनी या भूमिकेबद्दल कुठेही बोलली नव्हती. अगदी ती सोशल मीडियावर इतकी सक्रिय असूनही तिने कधीच याची कल्पना दिली नाही. आता अचानक हा सुखद धक्का प्रेक्षकांना दिल्यानंतर तिने एक पोस्ट शेयर केली आहे.


यावेळी तेजस्विनीने तिचा 'शूर्पणखा' भूमिकेतील फोटो शेयर करत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. तेजस्विनी म्हणते, 'आयुष्यात कधी केलं नाही, ते चित्रपटात करून घेतलं... म्हणून इतरांच्या गोष्टीत नाक खुपसू नये.. मला 'आदिपुरुष चित्रपटात "शूर्पणखा" म्हणून पाहा..'' अशी पोस्ट तिने शेयर केली आहे.

या पोस्टवर अनेकांनी तिचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट आणि भूमिका सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT