samantar 2 
मनोरंजन

Video : 'समांतर २'चा टीझर; कुमारच्या आयुष्यात पुढे काय घडणार?

दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य!

स्वाती वेमूल

आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. भविष्यात डोकावणं अनेकांनाच आवडत असतं. पण जर एखाद्या व्यक्तीसमोर त्याचा भविष्यकाळ प्रत्यक्षात कुणी जगत असेल तर? अशाच कथानकावर आधारित एमएक्स प्लेअरवर 'समांतर' Samantar ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 'समांतर २'ची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकताच दुसऱ्या सिझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने Tejaswini Pandit सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. त्याचप्रमाणे या सीरिजचा ट्रेलर येत्या २१ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं तिने सांगितलंय. (tejaswini pandit swwapnil joshi starrer samantar 2 teaser released)

समीर विद्वांस दिग्दर्शित या सीरिजमध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'दोन काळ, दोन व्यक्ती आणि एक रहस्य! पहा पुढे काय घडणार कुमारच्या आयुष्यात', असं कॅप्शन तेजस्विनीने या व्हिडीओला दिलं आहे. 'समांतर'मध्ये अभिनेत्री तेजस्विनीने स्वप्निल जोशी अर्थात कुमार महाजनच्या पत्नीची भूमिका साकारली होती. पण शेवटच्या भागात आणखी एका बाईची एंट्री होते. तर ही बाई कोण असेल याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या नावाच्या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. पहिल्या सिझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. नऊ भागांची ही सीरिज होती. आता दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात, दोन लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ

MCC License Suspended: मुंबईतील क्रिकेट संघटनांना तुकाराम मुंढेंचा दणका, क्रिकेट क्लब ऑफ इंडियासह ५ क्लबचे परवाने निलंबित

कमळीचा वेस्टर्न लूक पाहिलात का? हृषीसोबत केला बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स, Viral Video

Live Marathi News Update : पुण्यात सीएनजीच्या कमी दाबाच्या समस्येवर तातडीने उपाययोजनांची मागणी

Sahyadri Tiger Reserve : 'सह्याद्री'च्या जंगलात वाघांचं नवं राज्य! 'बाजी-हिरकणी'सह 3 जोड्या एकत्र; लवकरच मिळणार 'गोड बातमी', पाहा चांदोलीतील लेटेस्ट अपडेट

SCROLL FOR NEXT