Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya 
मनोरंजन

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: रोबोट आणि माणसाची प्रेमकहाणी, कसा आहे क्रिती आणि शाहिदचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'? नेटकरी म्हणतात...

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घेऊयात...

सकाळ डिजिटल टीम

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: अभिनेता क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले? जाणून घेऊयात...

काय म्हणाले नेटकरी?

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये (X) लिहिलं, "सुपरहिट", 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा एक आनंददायक रॉम-कॉम चित्रपट आहे. जो प्रेक्षकांना निश्चितपणे प्रभावित करेल. हा चित्रपट एक आकर्षक आहे. शाहिद आणि क्रिती यांच्यामधील केमिस्ट्री चांगली आहे, ज्यामुळे चित्रपट चांगला वाटतो."

एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट फ्रेश वाटतो. चित्रपटातील संगीत चांगले आहे. व्हॅलेंटाईन-डेचा काळ सुरु आहे. त्यामुळे यंदा हॉलिडेला हा चित्रपट तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पाहू शकता.एकंदरीत, या चित्रपट चांगला आहे.'

शाहिदच्या बायकोनं शेअर केला रिव्ह्यू

"हा चित्रपट पाहिल्यानंतर पोट धरुन हसाल! अनेक वर्षांनंतर मनोरंजन ओव्हरलोडेड चित्रपट पाहिला! प्रेम, हशा, मजा, डान्स आणि शेवटी एक हृदयस्पर्शी संदेश. शाहिद, तू एकदम परिपूर्ण होतास! तू OG लव्हर बॉय आहेस, तुझ्यासारखा कोणीच नाही. तू माझे हृदय जिंकले आहेस, या चित्रपटानं मला मनापासून हसवले"

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात क्रिती आणि शाहिद यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि धर्मेंद्र यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT