Terrence 
मनोरंजन

'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये टेरेन्सने दिवंगत कोरिओग्राफर सरोज खानच्या आठवणींना दिला उजाळा !

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- गेल्या आठवड्यात नवीन भागांसह धडाक्यात एंट्री केल्यानंतर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो 'इंडियाज बेस्ट डान्सर' आता येत्या भागात बॉलीवूडच्या महान कलाकारांना आदारांजली वाहण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षकांना सर्वोत्तम 12 स्पर्धक व त्यांचे कोरिओग्राफर यांचे उत्कृष्ट परफॉर्मन्सेस पाहायला मिळतील. त्यांचे परीक्षण करतील टेरेन्स लुईस, गीता कपूर आणि मलाइका अरोरा. अमिताभ बच्चनपासून महमूद तसेच श्रीदेवी, राज कपूर, राजेश खन्ना आणि ऋषी कपूर व इतर अनेक कलाकारांना हे स्पर्धक आपल्या खास डान्स शैलीत आदरांजली अर्पण करतील.

पुण्याहून आलेली स्पर्धक ऋतुजा जुन्नरकर ही ‘मास्टरजी’ सरोज खानने कोरिओग्राफ केलेल्या नृत्यांवर थिरकताना दिसेल. ऋतुजा आणि गुरु आशीष पाटील या दोघांनी बॉलीवूड डान्स गुरुने कोरिओग्राफ केलेल्या गीतांच्या मेलोडीवर परफॉर्म केले. त्या महान कोरिओग्राफरला वाहिलेली ही एक उत्कृष्ट श्रद्धांजली होती. तिन्ही परीक्षकांनी त्यांच्या ऍक्टचे तोंड भरून कौतुक केले आणि पहिल्यांदाच या शोमध्ये त्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. 

टेरेन्स म्हणाला, “सरोजजींसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यांची शिकवण्याची शैली अगदी वेगळीच होती. त्या अत्यंत शिस्तप्रिय होत्या पण त्यातूनच आम्ही खूप काही शिकलो. केवळ त्यांना पाहूनच मी काही अनमोल धडे घेतले आहेत. ऋतुजा, तुझ्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचे तर, जर सरोज जींनी तुझा परफॉर्मन्स पाहिला असता, तर त्यांनी तुझ्यासाठी नक्की काही तरी केले असते- नृत्याचे कौतुक करण्याची ती त्यांची पद्धत होती, आणि आज मी तेच करणार आहे.”

टेरेन्स मंचावर गेला आणि त्याने ऋतुजाला कौतुकाचे प्रतीक म्हणून 101 रु. दिले. चांगल्या नृत्याबद्दल डान्सरला कौतुक म्हणून पैसे देण्याची ही पद्धत सरोज खान त्यांच्या गुरूंकडून शिकल्या होत्या. हा मान मिळवल्यावर कोरिओग्राफर आशीष म्हणाला, “सरोज मॅम सोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. पण त्या माझ्यासाठी गुरु द्रोणाचार्य आणि मी एकलव्य होतो. केवळ त्यांचे निरीक्षण करून मी खूप काही शिकलो आहे.”

Terrence brings back memories of late choreographer Saroj Khan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025: बीसीसीआय भारत-पाकिस्तान सामना रद्द करू शकतं का? नेमका नियम काय आहे? वाचा...

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Latest Marathi News Updates : मोदींच्या एआय व्हिडीओमुळे पुण्यात भाजपचं आंदोलन

SCROLL FOR NEXT