Vijay Thalapathy  esakal
मनोरंजन

Thalapathy Vijay: साऊथस्टार विजयचा नादच नाय! ठरला Instagram वरही थलपती..येताच बनवला रेकॉर्ड

Vaishali Patil

आजच जग हे सोशल मिडियाचं आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराला सोशल प्लटफॉर्मसवर फॉलो करुन त्याच्याशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

मात्र आजही असे अनेक कलाकार आहेत जे सोशल मिडियावर तितके सक्रिय नसतात.त्यातला एक कलाकार म्हणजे साउथचा सुपरस्टार थलपथी विजय. तो आतापर्यंत इंस्टाग्रामपासून दूर होता. पण त्याने आता इन्स्टाग्रामवरही डेब्यू केला आहे.

थलपथी ची एंट्री म्हटल्यावर ती साधी तर राहणार नाही. त्याने इन्स्टाग्रामवर इतकी धमाकेदार एन्ट्री केली की नवा रेकॉर्डचं केला.

थलपथी विजयने 3 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर आपले खाते तयार करण्यासाठी एक पोस्ट पोस्ट केली आणि त्यामुळे खळबळ उडाली.

थलपती विजयच्या या पोस्टला काही तासांतच चार लाखांहून अधिक लाईक्स आणि साडेचार लाखांहून अधिक कमेंट्स मिळाल्या.

इतकच नाही तर थलपथी विजयचे इंस्टाग्रामवर ४ मिलियन फॉलोअर्सही झाले आहेत. इतकंच नाही तर थलपथी विजयने इंस्टाग्रामवर येताच अभिनेत्री रश्मिका मंदनाने लगेचच त्याला फॉलो करायला सुरुवात केली.

थलपथी विजयच्या इंस्टाग्राम पदार्पणाबद्दल सर्वांनी अभिनेत्याचे केवळ अभिनंदनच केले नाही तर त्याचे स्वागतही केले. थलपथी विजयची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

थलपथी विजय हा अनेक दिवसांपासून ट्विटर आणि फेसबुकवर असल्याची माहिती आहे, मात्र तो इस्टांग्रामपासून दूर होता. पण आता तो इंस्टाग्रामवरही चाहत्यांशी कनेक्ट झाला आहे.

थलपथी विजयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या 'लिओ'मध्ये व्यस्त आहे. लोकेश कनागराज दिग्दर्शित हा चित्रपट LCU युनिव्हर्सचा एक भाग आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संजय दत्तही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

एक-दोन नाही सात दिवसात शूट केलाय गोंधळ सिनेमाचा 25 मिनिटांचा वनटेक सीन !

SCROLL FOR NEXT