thalapathy vijay 'Leo' background dancers accuse makers of non-payment  SAKAL
मनोरंजन

Leo: रिलीजपूर्वीच थलापती विजयचा लिओ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, झालाय हा गंभीर आरोप

थलापती विजयचा लिओ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, वाचा संपूर्ण प्रकरण

Devendra Jadhav

Leo Movie News: काही दिवसांपुर्वी थलापती विजयचा लिओ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरने सोशल मीडियावर एकच धुमाकुळ घातला. थलापती विजयच्या फॅन्सना ट्रेलर प्रचंड आवडला.

आता सर्वजण सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची वाट बघत आहेत. सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या काही दिवसांवर आलं असताना लिओ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काय घडलंय बघा.

(thalapathy vijay 'Leo' background dancers accuse makers of non-payment)

दिग्दर्शक लोकेश कनागराज दिग्दर्शित, 'लिओ' चित्रपटातील 'ना रेडी' गाण्यावर काम करणाऱ्या काही बॅकग्राउंड डान्सर्सनी अपेक्षित पैसे न दिल्याची तक्रार केल्याने 'लिओ'ला आणखी एक अडथळा आला.

अलीकडेच, रियाझ अहमद या डान्सरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो निर्मात्यांना पैसे थकबाकी देण्याची विनंती करताना दिसत आहे. काही फ्रीलान्स डान्सर लोकांनी सेव्हन स्क्रीन स्टुडिओच्या कार्यालयात जाऊन याबद्दल जाबही विचारला.

प्रॉडक्शन हाऊसच्या सदस्यांनी डान्सरची भेट घेतली आणि नोंदणीकृत सदस्यांसाठी त्यांचे पगार डान्सर्स युनियनला पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र, पगार युनियनला पाठवण्यात आल्याचं कारण डान्सरला पटलं नाही.

10 ऑक्टोबरला, दक्षिण भारतातील फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष आरके सेल्वमणी यांनी एक निवेदन जारी केले की, पैसे थकबाकी आधीच देण्यात आलीय. सगळ्यांचे पैसे वेळेवर देण्यात आलेत.

त्यांच्या निवेदनात त्यांनी नमूद केले की, निर्मात्यांनी 2,000 बॅकग्राउंड डान्सर्ससह गाणे चित्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. तथापि, तामिळनाडू फिल्म, टेलिव्हिजन डान्सर्स अँड डान्स डायरेक्टर्स युनियन (TANTTNNIS) मध्ये केवळ 600 डान्सर्सने नोंदणी केली.

म्हणून, कोरिओग्राफर दिनेश मास्टरने युनियनमधून 600 डान्सरना कामावर घेतले आणि 1,400 लोकांना (फ्रीलान्सर म्हणून) कामावर घेतले जे युनियनचा भाग नव्हते. 'ना रेडी' गाणे 6 जून ते 11 जून दरम्यान सहा दिवस शूट करण्यात आले.

निर्मात्यांनी बाटा आणि इतर गोष्टींसह डान्सर्सना दररोज 1,750 रुपये देण्याचे मान्य केले होते. या करारानुसार, सेव्हन स्क्रीन स्टुडिओने 600 नोंदणीकृत डान्सरच्या संबंधित बँक खात्यात 94,60,500 रुपये जमा केले होते.

पुढे, प्रति व्यक्ती 10,500 रुपये (सहा दिवसांसाठी) त्यांच्या संबंधित बँक खात्यांमध्ये युनियनमध्ये नोंदणीकृत नसलेल्या नर्तकांना जमा केले गेले. त्यामुळे नोंदणी झालेल्या आणि नोंदणी नसलेल्या अशा सर्व डान्सरचे पैसे देण्यात आले असल्याचं सांगण्यात आलंय. 'लिओ' निर्मात्यांवरील आरोप खोटे आहेत, असे आरके सेल्वामणी म्हणाले. आता या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.

बहुचर्चित लिओ सिनेमा १९ ऑक्टोबरला जगभरात रिलीज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT