Thalapathy Vijay Leo  esakal
मनोरंजन

Thalapathy Vijay Leo : शाहरुखच्या 'पठाण'चं अन् रॉकीच्या 'KGF' चं रेकॉर्ड विजयच्या 'लिओ'नं मोडलं!

या सगळ्यात थलापती विजयच्या लिओ नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा जवान प्रदर्शित झाला होता.

युगंधर ताजणे

Leo Advance Booking In UK: कोरोनानंतर भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले आहे. अनेक चित्रपट हे ओटीटीवर प्रदर्शित सुरुवात झाले आहेत. अशातच काही अभिनेत्यांचा प्रभाव हा परदेशातील त्यांच्या चाहत्यांवर कायम असल्यानं त्यांनी त्या कलाकारांचे चित्रपट पाहण्यास थिएटरमध्येच प्राधान्य दिले आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यासगळ्यात थलापती विजयच्या लिओ नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखचा जवान प्रदर्शित झाला होता. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. या चित्रपटानं आतापर्यत बॉक्स ऑफिसवर सातशे कोटींची कमाईही केली होती. त्यात एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूडचा चित्रपट म्हणूनही त्यानं आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

सध्या शाहरुख आणि यशच्या केजीएफनंतर परदेशातील बॉक्स ऑफिसवर थलापती विजयच्या लिओच्या नावाची चर्चा होत आहे. त्याचा हा चित्रपट चाहत्यांच्या मोठ्या उत्सुकतेचा आहे.गेल्या काही दिवसांपासून त्याचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहे. यापूर्वी विजयच्या चित्रपटांना यावर्षी जेमतेम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षी त्याच्या मास्टर चित्रपटानं मोठी कमाई केली होती.

विजयचा लिओ नावाचा चित्रपट हा १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटानं मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यानं या विक्रमात शाहरुखच्या पठाण आणि यशच्या केजीएफला मागे टाकले आहे. ट्रेंड अनालिस्ट तरण आदर्शनं केलेल्या ट्विटनुसार, अजून विजयचा लिओ प्रदर्शित होण्यास दोन आठवड्यांचा वेळ आहे. मात्र युकेमध्ये लिओचे अॅडव्हान्स बूकींग जोरदार सुरु आहे.

लिओला परदेशात मिळालेला प्रतिसाद बघता अनेकांनी हा चित्रपट येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी साऊथ मधून मणिरत्नम यांच्या पोनियन सेल्वनने वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. आता हीच मोठी अपेक्षा थलापती विजयकडून केली जात आहे. येणाऱ्या काळात पोनियन सेल्वनचा रेकॉर्ड लिओ मोडणार का, याची विजयच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT