Thalapathy Vijay Starrer 'Leo' Records Over 10,000 Advance Booking In The UK in just 24 hours.  Esakal
मनोरंजन

Thalapati Vijay: शाहरुखच्या जवानला थलपतीचा लिओ एकटाच भिडणार! रिलिजच्या 42 दिवसांपूर्वीच केला रेकॉर्ड

Thalapati Vijay Leo हा चित्रपट 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

Vaishali Patil

Thalapati Vijay Leo Advance Booking: गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानचा जवान हा सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. चित्रपटाने रिलिजच्या पहिल्यादिवशीच बंपर ओपनिंग करत बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड केला.

इतकच नाही तर या सिनेमाने केवळ तीनच दिवसात तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे शाहरुखचा जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. मात्र आता शाहरुखच्या जवानला टक्कर द्यायला थलपती विजय मैदानात उतरणार आहे.

थलपती विजय हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. त्याचा काही वेगळा परिचय देण्याची गरज नाही. केवळ दक्षिणेतच नाही तर त्याचे चाहते जगभर आहेत. ते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात.

अशा परिस्थितीत विजयचा आणखी एक चित्रपट 'लिओ' प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटासाठी खुपच उत्सूक आहेत. तर यूकेमध्ये रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे.

थलपथी विजयचे स्टारडम यावरून कळू शकते की त्याच्या "लिओ" चित्रपटाने यूकेमध्ये रिलीज होण्या पुर्वीच रेकॉर्ड केला आहे. या चित्रपटाने रिलिजच्या 42 दिवस आधीच दहा हजार तिकिटे बुक करण्याचा विक्रम केला आहे. ही बातमी अहिंसा एंटरटेनमेंटने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

एजन्सीने सोशल मीडिया ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली होती. त्याने लिहिले, "वाह! आम्ही स्टेज सेट केलाय. पण तुम्ही शो चोरला! 24 तासांत 10 हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली. त्याची विक्री 100 हजार पौंडच्या पुढे गेली.. हे मास वाटत आहे? UK मध्ये LEO साठी तुम्ही दाखवलेलं प्रेमाने आमचा आनंद वाढवला. 19 ऑक्टोबर हा आमचा थलापथी साजरी करण्याचा दिवस आहे. तो संस्मरणीय बनवूया!"

हा चित्रपट 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची क्रेझ पाहून असे दिसते की हा चित्रपट अनेक मोठमोठे रेकॉर्ड मोडणार यात काही शंकाच नाही. आता हा चित्रपट शाहरुखच्या जवानचा रेकॉर्ड मोडू शकतो का हे पहावे लागणार आहे.

त्याचबरोबर या चित्रपटात थलपती विजयसोबत बॉलिवूडचा खलनायक संजय दत्तही महत्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनाग्रा यांनी केले आहे. 'लिओ'मध्ये थलपथी विजय, त्रिशा, संजय दत्त, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मॅथ्यू थॉमस यांच्या भूमिका आहेत.

तर दुसरीकडे विजयच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास असल्याचे एक कारण असंही सांगितले जात आहे की या चित्रपटानंतर विजय आणखी एक चित्रपट करेल आणि मनोरंजन विश्वाला रामराम ठोकत राजकारणात पदार्पण करेल. मात्र याबाबत विजयने काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT