rakesh roshan 
मनोरंजन

अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर हल्ला केलेल्या शार्पशूटरला अटक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर २००० साली झालेल्या हमल्यामध्ये सामील असलेल्या एका शार्पशूटरला पॅरोलचा काळ पूर्ण झाल्यावर जेलमध्ये परतला नसल्याने आता तब्बल तीन महिन्यांनंतर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून अटक केली आहे. 

एका वरिष्ठ अधिका-याने शनिवारी सांगितलं की '५२ वर्षीय सुनील विश्वनाथ गायकवाडला शुक्रवारी रात्री नऊ वाजता कळव्याच्या पारसिक सर्कल भागात पकडलं गेलं.' केंद्रीय गुन्हेगारी युनिटचे निरिक्षक अनिल होनराव यांनी सांगितलं की, 'आम्हाला माहिती मिळाली की गायकवाड पारसिक सर्कल भागात येत आहे. आम्ही जाळं टाकलं आणि त्याला पकडलं.'

त्यांनी सांगितलं की, 'आरोपीच्या विरोधात हत्येच्या ११ केसेस आहेत आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या ७ केसेस दाखल केले गेले आहेत. यामधील एक प्रकरण २००० मध्ये बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आहे. पोलिसांनी सांगितलं की रोशन यांच्यावर २००० साली मुंबईमध्ये त्यांच्या सांताक्रुझ कार्यालयाच्या बाहेर गोळी मारली होती. हल्लेखोराने सहा गोळ्या चालवल्या होत्या. ज्यापैकी २ गोळ्या रोशन यांना लागल्या होत्या.'

पोलिसांनी सांगितलं की, 'गायकवाडला हत्येच्या केसमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा मिळाली होती नाशिकच्या जेलमध्ये बंद होता. तो २८ दिवसाच्या पॅरोलवर २६ जूनला बाहेर आला होता. पॅरोलचा काळ पूर्ण झाल्यावर त्याला जेलमध्ये येणं होतं मात्र तो आला नाही. त्याला काल रात्री अटक केली. गायकवाडवर पंत पोलिस स्टेशनमध्ये सोपवलं जाईल. जिथए त्यावर फरार होण्याचा आरोप लावला आहे.'

thane police arrests accused of attacking film actor rakesh roshan for jumping parole  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT