Thangalaan movie teaser vikram malvika mohnan movie relased in january 2024 SAKAL
मनोरंजन

Thangalaan Teaser: विक्रमला ओळखणंही कठीण झालंय! 'थंगलान'चा अंगावर काटा आणणारा थरारक टिझर पाहाच

विक्रमच्या थंगलान सिनेमाचा टिझर रिलीज झालाय, तुम्हीही बघा

Devendra Jadhav

Thangalaan Teaser News: साऊथ अभिनेता विक्रमने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. विक्रमने अपरिचीत, आय, पोनियन सेल्वन अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

अशातच विक्रमच्या आगामी थांगलान सिनेमाचा पहिला टीझर समोर आलाय. विक्रमच्या या सिनेमाचा टीझर जबरदस्त आहे. टीझरमध्ये विक्रमला ओळखणंही कठीण झालंय.

(Thangalaan movie teaser vikram malvika mohnan movie relased in january 2024)

विक्रमच्या थंगलान सिनेमाचा टीझर रिलीज

थंगलान सिनेमाच्या टीझर कोलार गोल्ड फील्ड्स आणि त्यांच्या जवळ राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या आयुष्यावर आधारित असल्याचं. चियान विक्रमचा सबंध टिझरमध्ये पूर्णपणे वेगळा पोशाख आणि लुक केलेला दिसतो.

घाणेरडे केस, लांब - जटाधारी लांब केस, पोट थोडे बाहेर आलेले, चेहरा रापलेला अशा भयानक अवतारात विक्रम दिसतोय. विक्रमला या अवतारात ओळखणंही कठीण झालंय. सिनेमात एक आदीवासी माणुस अजगर हातात घेऊन त्याला मधोमध तोडतो. अंगावर काटा आणणारे असे अनेक प्रसंग सिनेमात बघायला मिळत आहेत. (Latest Marathi News)

मालविका मोहननची टीझरमध्ये झलक

शिवाय, टीझरमधून मालविका मोहननच्या व्यक्तिरेखेची एक झलक दाखवण्यात आली आहे. मालविका जोरात आक्रोश करताना दिसतेय.

थंगलान सिनेमाची नेमकी कथा काय आणि सिनेमात विक्रम - मालविकाशिवाय आणखी कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. (Latest Marathi News)

थंगलान सिनेमाची रिलीज डेट काय?

थंगलान सिनेमा जानेवारीमध्ये थिएटरमध्ये दाखल होत आहे. पा रंजित यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. जीव्ही प्रकाश कुमार यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.

अशाप्रकारे विक्रमचे चाहते टिझर पाहिल्यापासुन सिनेमाची वाट बघत आहेत. पुन्हा एकदा विक्रम त्याच्या अभिनयाने फॅन्सचं मन जिंकणार यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्मानिय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT