Thank God and Ram Setu movie day 1 boxoffice collection,who is beating whom. Google
मनोरंजन

Box Office: 'रामसेतू की थॅंक गॉड', पहिल्या दिवशी कोण कोणावर पडलं भारी?, समोर आले आकडे...

अक्षयचा 'रामसेतू' आणि अजयचा 'थॅंक गॉड' एकाच दिवशी २५ ऑक्टोबरला रिलीज होणार असल्याने बॉक्सऑफिसवर तगडी टक्कर पहायला मिळणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली होती.

प्रणाली मोरे

Box Office: बॉक्सऑफिसवर आज दोन बड्या स्टार्सचे सिनेमे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत, यात पहिला आहे अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिसचा 'रामसेतू' आणि दुसरा अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थॅंक गॉड'. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही सिनेमांविषयी जोरदार चर्चा रंगली आहे. तर दोन्ही सिनेमांचे ट्रेलर इंटरनेटवर जोरदार व्हायरल झाले आहेत. पण बॉक्सऑफिसवर हे दोन्ही सिनेमे ओपनिंग डे ला काय कमाल करतील, कोण राहिल कोणाच्या पुढ, काय म्हणत आहेत ट्रेड तज्ञ? चला,जाणून घेऊया.(Thank God and Ram Setu movie day 1 boxoffice collection,who is beating whom.)

ट्रेड तज्ञ सुमित काडेलनं सांगितलं की, अक्षय कुमारचा 'रामसेतू' ओपनिंग डे ला १५ ते १७ करोड कमावू शकतो. तर अजय देवगण,रकुल प्रीत आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थॅंक गॉड' ओपनिंग डे रोजी १० ते १२ करोडचा बिझनेस करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सुमित काडेल यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे- ''दोन्ही सिनेमांचे अॅडव्हान्स बुकिंग दिवाळीच्या सुट्ट्यांच्या मानानं खूप कमी राहिलं आहे. पण अजूनही स्पॉट बुकिंग होऊ शकतं. अजय देवगणचा 'थॅंक गॉड' वादात सापडल्यामुळे बॉक्सऑफिसवर डगमगताना दिसत आहे, तर अक्षय कुमारच्या 'रामसेतु'ला मात्र लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे''.

थॅंक गॉड सिनेमा हा एक कौटुंबिक सिनेमा असल्यामुळे कदाचित लोक याला अधिक पसंती देतील असा अंदाज देखील वर्तवला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर भले सिनेमाच्या विरोधात आवाज उठवला जात असला तरी बॉक्सऑफिसचे आकडे वेगळे असू शकतात. पण सध्या तरी ट्रेड तज्ञांच्या मते 'रामसेतू' सिनेमाच बॉक्सऑफिसवर अधिक कमाई करत पुढे जाऊ शकतो असं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : हिवरखेड प्रा.आ.केंद्रात अवैध गर्भपाताची शक्यता

SCROLL FOR NEXT