Thank You For Coming movie review  esakal
मनोरंजन

Thank You For Coming movie review : 'आज लग्न केलं तर दोन वर्षात मुलं होतील नाहीतर....', पाच जणींनी 'पुरुषीपणा'ला दिलं मोठं आव्हान

तुम्ही जेव्हा थँक यू फॉर कमिंग पाहण्यासाठी जाता तेव्हा दिग्दर्शकानं कित्येक महत्वाच्या गोष्टी विनोदाच्या माध्यमातून तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं सांगितल्या आहेत.

युगंधर ताजणे

Thank You For Coming movie review: एका अर्थी किरण बुलानी यांचे कौतुक करायला हवे की, त्यानं एका आगळ्या वेगळ्या विषयावर त्यानं भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला आणि त्यांचे लैंगिक स्वातंत्र्य. असा तो विषय असून त्यावर त्यानं विनोदाच्या माध्यमातून केलेलं भाष्य लोकप्रिय होताना दिसत आहे. म्हणून की काय थँक यू फॉर कमिंग चाहत्यांना भावताना दिसत आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यापूर्वी बॉलीवूडमध्ये अँग्री इंडियन गॉडेस, पार्श्ड आणि लिपस्टिक अंडर माय बुरखा सारख्या चित्रपटांतून महिलांच्या सक्षमीकरणाविषयी प्रभावीपणे भाष्य करण्यात आले होते. अलीकडे भूमी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा डबल एक्स एल नावाचा जो चित्रपट आला होता त्यानंही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. बॉडी शेमिंग सारख्या महत्वाच्या मुद्द्यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले होते.

तुम्ही जेव्हा थँक यू फॉर कमिंग पाहण्यासाठी जाता तेव्हा दिग्दर्शकानं कित्येक महत्वाच्या गोष्टी विनोदाच्या माध्यमातून तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं सांगितल्या आहेत. खरं तर आता ओटीटीच्या माध्यमातून बोल्ड कंटेट समोर येत असल्यानं सेक्स आणि त्याच्याशी संबंधित गोष्टीकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्यापैकी बदलल्याचे दिसून आले आहे.अनेक बाबी आपण मोकळ्या मनानं स्विकारल्याही आहेत. पूर्वी ज्या दृष्टिकोनातून सेक्स याविषयाकडे पाहिले जात होते तो आता बऱ्याच अंशी बदलला आहे.

भूमीनं या चित्रपटातून प्रेक्षकांची, तिच्या चाहत्यांना जिंकून घेतले आहे. गेल्या दोन वर्षांपासून भूमीच्या वाट्याला जेवढ्या भूमिका आल्या आहेत त्यात तिनं प्रभावी कामगिरी केली आहे. आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करतो असे म्हणतो तेव्हा अजूनही महिला आणि पुरुष यांच्या संबंधाकडे कशा दृष्टीनं पाहतो असा प्रश्न भूमी प्रेक्षकांना विचारतो. भूमीनं कनिका नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यात तिच्या लैंगिकतेविषयीच्या काही वेगळ्या कल्पना आहेत.

भूमी म्हणते की, मला जे वाटतं ते आहे. मी काही कुणापासून काही लपवून ठेवलेले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे माझे अमूक एवढ्या पुरुषांशी संबंध आले तर त्यात काय बिघडले, पुरुषांचे त्यांच्या आयुष्यात ज्या महिलांशी संबंध येतात त्यावेळी तुम्ही त्यांना सूट का देता, त्यांना का नाही जाब विचारत, आपण अजूनही कोणत्या मानसिकतेमध्ये जगतो, महिला आणि पुरुष यांच्या शाररिक गरजा काही वेगळ्या आहेत का, मग त्यात भेदभाव का, असा प्रश्न भूमीनं या चित्रपटाच्या माध्यमातून विचारला आहे.

प्रत्येकवेळी मुलांनीच का मजा करायची, मुली मजा करु शकत नाही का, मुली जेव्हा मजा करतात तेव्हा त्याकडे वेगळ्या दृष्टीनं का पाहिले जाते, हेच नव्हे अशाप्रकारचे वेगवेगळे प्रश्न भूमी आणि तिच्या मैत्रीणी उपस्थित करतात, प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. नीतिमुल्याचे विनोदाच्या माध्यमातून धडे देण्याचे काम थँक यू फॉर कमिंग या चित्रपटातून केले गेले आहे.

एकीकडे केवळ मारधाड, हिंसा आणि अॅक्शन टाईपचे चित्रपट समोर येत असताना दैनंदिन आयुष्यात ज्या विषयांना सामोरं जावं लागते त्यावर चित्रपट तयार करण्याचे धाडस दिग्दर्शक करण बूलानी यांनी दाखवले आहे. त्यामुळेच की काय प्रेक्षकांनी या चित्रपटाची वाहवा केली आहे. सोशल मीडियावर थँक यू फॉर कमिंगवर आलेल्या प्रतिक्रियाही त्या चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

कनिकासह तिच्या पाच मैत्रीणींची भन्नाट गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. जी हलक्या फुलक्या कधी द्विअर्थी संवादातून प्रेक्षकांसमोर येते. हसून हसून लोटपोट झाल्यानंतर प्रेक्षकांपुढे काही गंभीर प्रश्न दिग्दर्शक उपस्थित करतो. त्यामुळेच की काय भूमीनं जे प्रश्न विचारलेत त्याची उत्तरं पुरुषप्रधान संस्कृतीकडे आहेत का असाही एक प्रश्न पडून जातो. हा चित्रपट पाहिल्यानंतर आजची तरुणाई एका वेगळ्या अँगलनं स्त्री-पुरुष संबंधाकडे पाहू लागेल असे वाटते.

-----------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - Thank You For Coming

कलाकार - भूमी पेडणेकर, शहनाज गिल, डॉली सिंग, शिबानी बेदी, कुशा कपिला, नताशा रस्तोगी, डॉली अहलुवालिया, प्रद्युम्न सिंग आणि सुशांत दिगवेकर

दिग्दर्शक - करण बुलानी

रेटिंग - तीन स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT