The Archies Teaser out Esakal
मनोरंजन

The Archies: चला नेपो बेबीजला लॉन्च करण्याची वेळ झाली!, 'द आर्चीज'चे नवीन पोस्टर येताच..ट्रोलिंग सुरु...

Vaishali Patil

झोया अख्तरचा आगामी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणारा 'द आर्चिज' सिनेमाचा टिझर आणि पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. त्याच कारणा आहे या चित्रपटातील कलाकार.

या सिनेमातील सुहाना खान(Suhana Khan),खुशी कपूर(Khushi Kapoor),अगस्त्य नंदा यांच्यासोबत इतर स्टार किड्स यांच्या भुमिका आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून स्टार किड्सच्या इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. त्यात जान्हवी असो किंवा आलिया नाहीतर अनन्या.. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अनेक स्टार्सची मुलं आपापल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत.

त्यामुळे आता हा चित्रपट चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांचा या चित्रपटाला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही असं काहीस चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून नेपोटिझम आणि नोपो किड्स हे नेहमीच ट्रोलरच्या निशाण्यावर असतात. त्यातच आता हे कलाकारही पदार्पण करणार असल्यामुळे नेटकरींनी त्यांना ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.

हे पोस्टर शाहरुख खानची लाडकी सुहाना खान, जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्य नंदा यांनीही शेअर केले आहे.

सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं तर जरी हे स्टार किड्स असले तरी सिनेमातील ते सगळे फ्रेश चेहरे आहेत. कारण त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे.

सुहाना,खुशी,अगस्त्य व्यतिरिक्त मिहिर अहूजा,डॉट,वेदांग रैना आणि युवराज मेंडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिलिज डेट समोर आली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT