Armaan Kohli Google
मनोरंजन

अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणात पुरता फसला,कोर्टानं पुन्हा फेटाळला जामीन

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अरमान कोहलीकडे १.२ ग्राम कोकिन सापडल्यानं त्याला अटक करण्यात आली होती

प्रणाली मोरे

ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अरमान कोहलीचा(Armaan Kohli) जामीन अर्ज एकदा पुन्हा कोर्टानं फेटाळला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अरमान कोहलीकडे १.२ ग्राम कोकिन सापडल्यानं त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या घरावर छापा टाकून तपासात ड्रग्ज सापडलं होतं. आता एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामिन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे.

विशेष कोर्टानं जामिन अर्ज रद्द करताना सांगितलं,''अरमान कोहलीनं सह-आरोपीसोबत मिळून ड्रग्ज सेवन करण्यासोबतच त्याची तस्करीही केल्याचं प्राथमिक पातळीवर चौकशीनंतर निदर्शनास आलं आहे. कमी ड्रग्ज सापडलं असलं तरी ते सापडणं आणि त्याचे धोके लक्षात घेता हे गंभीर प्रकरणात मोडतं. त्यामुळे याआधारावरच जामिन अर्ज रद्द केला जात आहे''. याचबरोबर अरमान कोहलीच्या मोबाईलमध्ये काही अशा गोष्टी हाती लागल्या आहेत ज्या अभिनेत्या विरोधातील पुरावे म्हणून कोर्टात सादर करण्यात आल्या आणि त्या सर्व गोष्टी कोर्टाच्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

अरमान कोहली मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये गेल्या वर्षीपासून कैदेत आहे. अरमान कोहली शेवटचा सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात दिसला होता. तसंच 'जानी दुश्मन: एक अनोखी कहानी' आणि 'एलओसी कारगिल' या सिनेमातही त्यानं काम केलेलं आहे. तसंच,बिग बॉसमध्येही त्यानं सहभाग घेतला होता. त्यावेळी काजोलची बहिण तनिशा मुखर्जीसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अरमान कोहली गेले ९ महिने जेलमध्ये कैदेत आहेत आणि त्यानंतर त्यानं अनेकदा जामिनासाठी अर्ज केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : मालेगावात हलगर्जीपणाचा कळस! मृत शिक्षकाला लावली निवडणूक ड्युटी; गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वर मंदिरात ५ जानेवारीपर्यंत VIP दर्शन बंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश

Karuna Munde हिंदूंनी ४ मुलं जन्माला घालावीत म्हणणाऱ्या Navneet Rana ना टोला | Sakal News

Mumbai News: ९०७ हॉटेल, पब, बार, क्लबची झाडाझडती; अग्निशमन दलाकडून आस्थापनांवर कारवाईचा बडगा

Nashik Wine : नाशिकच्या 'रानमेव्या'चा अमेरिकेत डंका; जांभूळ वाइनची पहिली खेप सातासमुद्रापार रवाना!

SCROLL FOR NEXT