The Family Man 2 esakal
मनोरंजन

The Family Man 2 ट्रेलरने युट्यूबवर रचला विक्रम; 'मिर्झापूर २'ला टाकलं मागे

अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला मिळाले इतके व्ह्यूज

प्रियांका कुलकर्णी

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या The Family Man 2 दुसऱ्या भागाचा ट्रेलर १९ मे रोजी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून युट्यूबवर या ट्रेलरने सर्व विक्रम मोडले आहेत. अवघ्या २४ तासांत या ट्रेलरला युट्यूबवर 15 दशलक्ष लोकांनी पाहिले. 'द फॅमिली मॅन 2'ने मिर्झापूर-2 च्या Mirzapur 2 ट्रेलरचे रेकोर्ड मोडले आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनच्या ट्रेलरला युट्यूबवर २४ तासांत 12 दशलक्ष लोकांनी पाहिले होते. (The Family Man 2 trailer gets 15 million views on YouTube beats Mirzapur for top spot)

'द फॅमिली मॅन-2' या वेब सीरिजचा ट्रेलर हा २४ तासांत भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला ट्रेलर आहे. यावर अभिनेत्री समंथा अक्किनेनीने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी, सीमा बिस्वास, शरद केळकर, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, शहाब अली, श्रेया धन्वंतरी, महेक ठाकूर आणि वेदांत सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

The Family Man 2 trailer gets 15 million views

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे तो पुढे ढकलण्यात आला. येत्या ४ जून रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शक राज, डीके आणि सुपरन एस वर्मा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT