The Family Man 3 esakal
मनोरंजन

The Family Man 3: श्रीकांत तिवारी फेम मनोज वाजपेयीनं केला मोठा खुलासा!

आता त्या मालिकेच्या तिसऱ्या सीझनबाबत मनोज वाजपेयीनं मोठा खुलासा केला आहे. तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Family Man 3 web serise new update viral: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या भारतीय वेबसीरिजनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे त्यात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीनं प्रमुख भूमिका साकारली आहे. आता त्या मालिकेच्या तिसऱ्या सीझनबाबत मनोज वाजपेयीनं मोठा खुलासा केला आहे. तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

फॅमिली मॅन ही वेबसीरिज भारतात पाहिली गेलेली आणि प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळालेली मालिका आहे. त्याला मिळालेलं रेटिंगही जबरदस्त आहे. द फॅमिली मॅनच्या पहिल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांकडूनही मोठी दाद मिळाली होती. आता त्याच्या तिसऱ्या सीझनचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. त्याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. या सीरिजमध्ये श्रीकांत तिवारी नावाची प्रमुख व्यक्तिरेखा साकारलेल्या मनोज वाजपेयीनं याविषयी मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

काही दिवसांपासून फॅमिली मॅनविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा व्हायरल होत होत्या. त्यात मनोज वाजपेयी भूमिका साकारणार नाही. असेही बोलले जात होते. आता त्यावर मनोजची एक पोस्ट समोर आली आहे. त्यामध्ये त्यानं या मालिकेचा सीझन हा पुढील वर्षी २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आपण त्या मालिकेत काम करणार असल्याचे सांगत प्रेक्षकांना मोठा दिलासा दिला आहे.

दिग्दर्शक राज निदीमोरु आणि कृष्णा डीके यांनी दिग्दर्शित केलेल्या फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. ही विशेष म्हणजे अॅमेझॉन प्राईमला देखील ही सीरिज लवकरात लवकर ओटीटीवर यावी अशी इच्छा आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT