the family man 2 
मनोरंजन

The Family Man Season 2: धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित; सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

मनोज वाजपेयीसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीची महत्त्वपूर्ण भूमिका

स्वाती वेमूल

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज 'द फॅमिली मॅन २'चा The Family Man Season 2 ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजची चर्चा होती. जवळपास अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अभिनेता मनोज वाजपेयीने Manoj Bajpayee प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकून घेतली आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये त्याच्या अभिनयावरून नजर हटत नाही. येत्या ४ जूनला ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पहिल्या सिझननंतर याच्या दुसऱ्या सिझनची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. (The Family Man Season 2 Official Trailer released Manoj Bajpayee Samantha )

या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी हा कुटुंब, ऑफिस आणि देश या तिन्ही जबाबदाऱ्या एकत्र पूर्ण करताना दिसत आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीची Samantha महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सीरिजच्या माध्यमातून समंथाने वेब विश्वात पदार्पण केलं आहे. यामध्ये ती रज्जी नावाच्या एका महिलेची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच सीमा बिस्वास, सनी हिंदुजा, दर्शन कुमार, श्रेया धन्वंतरी, मिमे गुप्ता यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन राज एंड डीके यांनी केले आहे.

दुसऱ्या सिझनमध्ये अनेक नव्या पात्रांचा समावेश झाला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पुन्हा एकदा मनोज वाजपेयी यांच्या अभिनयकौशल्याचं कौतुक होतंय.

काय होती पहिल्या सिझनची कथा?

नावाप्रमाणेच सीरिजमध्ये मनोज वाजपेयी हा 'फॅमिली मॅन' आहे. त्याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच तो राष्ट्रीय तपास यंत्रणेत गूढरित्या काम करत असतो. त्याच्या पत्नीला कामाबद्दल थोडीफार माहिती असते. या सगळ्यात त्याला दहशतवादी मिशनचा अलर्ट मिळतो. तो मिशन हाणून पाडण्यासाठी मनोज वाजपेयी काय करतो, यात त्याला कोणाची साथ मिळते यावर दहा एपिसोड्सची ही सीरिज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT