the great indian family trailer vicky kaushal manushi chhillar comedy movie  SAKAL
मनोरंजन

The Great Indian Family Trailer: पंडितांच्या घरात जन्माला येणार मुस्लिम बाळ? विकी - मानुषीच्या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर

विकी कौशल - मानुषी छिल्लरच्या द ग्रेट इंडियन फॅमिलीचा ट्रेलर एकदा बघाच

Devendra Jadhav

गेल्या अनेक दिवसांपासुन बॉलिवूडमध्ये नवीन आणि अनोखे सिनेमे घेऊन हटके सिनेमा भेटीला येत आहेत. OMG 2, गदर 2 आणि नुकताच आलेला जवान अशा बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय.

अशातच आणखी एक हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे द ग्रेट इंडियन फॅमिली. विकी कौशल, मानुषी छिल्लर असे कलाकार या सिनेमात प्रमुख भुमिका साकारणार आहेत.

(the great indian family trailer vicky kaushal manushi chhillar comedy movie)

काय आहे द ग्रेट इंडियन फॅमिलीचा ट्रेलर ?

द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये विकी कौशल भजन गाणारा एक मुलगा असतो. त्याचं कुटुंब अनेक वर्षांपासुन पूजा - पाठ करणारं पंडित असतं.

अशातच विकीची भेट एका मुलीशी होते, हीच मुलगी म्हणजे मानुषी छिल्लर. मानुषी आणि विकी एकमेकांच्या प्रेमात पडतात.

आणि अशातच त्यांच्या घरी एक पत्र येतं. त्या पत्रात तुमच्या घरी मुस्लिम बाळ जन्माला येणार, असं पत्र येतं. आणि या पत्राने सर्व हादरतात. मग पुढे काय होतं? याची कहाणी द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमात दिसते.

पुन्हा एकदा मानुषी छिल्लर

अभिनेत्री मानुषी छिल्लर ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. पृथ्वीराजमधील तिच्या उल्लेखनीय पदार्पणानंतर आता ती विकी कौशल, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या सोबतीने "द ग्रेट इंडियन फॅमिली" मध्ये रुपेरी पडद्यावर पुन्हा पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे.

द ग्रेट इंडियन फॅमिली हा एक चित्रपट भावनांचा रोलर-कोस्टर राइड असल्याच कळतंय. मानुषी छिल्लर सिनेमात एका सशक्त स्त्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

कधी रिलीज होणार द ग्रेट इंडियन फॅमिली सिनेमा?

ट्रेलर मधून मानुषी छिल्लरच्या अभिनयाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. पण आता सगळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक आहेत. मानुषीच्या मनमोहक अदा " द ग्रेट इंडियन फॅमिली " सिनेमात बघायला मिळणार आहेत

मानुषी आणि विकीचा द ग्रेट इंडियन फॅमिली 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार असुन एक उत्तम सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT