The Hunt For Veerappan Review  esakal
मनोरंजन

The Hunt For Veerappan Review : बहिणीचा आनंद वीरप्पनला पाहवला नाही, त्यानं तिच्या नवऱ्याला...!

आपण काही करून त्यावर मालिका करायची ही गोष्ट पक्की झाली. त्यातून आता द हंट फॉर वीरप्पन नावाची मालिका समोर आली आहे.

युगंधर ताजणे

The Hunt For Veerappan Review : ज्या जंगलांमध्ये सुर्याची किरणंही मोठ्या मह्त प्रयासानं शिरतात ते कर्नाटक राज्यातलं घनदाट जंगलात तो ३९ वर्षांचा क्रुर माणूस ठाण मांडून होता. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जितके कष्ट घेतले तेवढे कदाचित दुसऱ्या कुणासाठी घेतले असतील. लांब मिशावाल्या वीरप्पनचा दराराच असा होता की, त्याच्या जवळ जाण्याची कुणातही हिंमत नव्हती. शेवटी सरकारला तो निर्णय घ्यावा लागला त्यामुळे मात्र वीरप्पनची अखेर झाली, पण वीरप्पन सगळ्यांसाठी दंतकथा होऊन बसला होता.

१८ ऑक्टोबर २००४ रोजी कन्नड पोलिसांना घोषित करावं लागलं की त्यांनी वीरप्पनला मारले. वीरप्पनशी संबंधित वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य करणारी नेटफ्लिक्सची नवी मालिका 'द हंट फॉर वीरप्पन' चर्चेत आली आहे. त्याचा विषयही गंभीर आहे. यापूर्वी वीरप्पनवप आधारित अनेक मालिका आणि माहितीपट समोर आले आहेत. मात्र ही माहितीपट मालिका तुम्हाला वीरप्पनविषयी काही वेगळू सांगू पाहते. त्यामध्ये वीरप्पनच्या लवस्टोरीविषयी देखील सांगण्यात आले आहे. प्रसिद्ध तमिळ फिल्म निला चे दिग्दर्शक सेल्वमणि सेल्वराज यांनी ही मालिका तयार केली आहे. जी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

दिल्ली क्राईमच्या रिसर्च टीममध्ये ज्यांचा मोठा सहभाग होता त्या अपूर्वा बख्शी आणि मोनिषा त्यागराजन यांनी जेव्हा सेल्वराज यांना वीरप्पन विषयावर केलेल्या संशोधनाविषयी सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला. आपण काही करून त्यावर मालिका करायची ही गोष्ट पक्की झाली. त्यातून आता द हंट फॉर वीरप्पन नावाची मालिका समोर आली आहे. पैशांसाठी एक हजार हत्तींची हत्या करणारा, हस्तिदंताची तस्करी करणारा, दोनशेहून अधिक व्यक्तींचा जीव घेणारा, दुसरीकडे एक बाप म्हणून असहाय्य होणारा वीरप्पन एका वेगळ्या प्रकारे आपल्यासमोर येतो.

वीरप्पनच्या बहिणीचं एका वन अधिकाऱ्यावर प्रेम बसतं. ते दोघेही मुक्तपणे फिरु लागतात. भेटतात, जेव्हा ती गोष्ट वीरप्पनसमोर येते तेव्हा तो त्या वनधिकाऱ्याची हत्या करण्याचे आदेश देतो. तो प्रसंग दिग्दर्शकानं प्रभावीपणे चित्रित केला आहे. ते पाहून बहिण आत्हत्या करते. यानंतर मात्र गावात वीरप्पनविषयी वेगळेच वातावरण तयार होते. तो आपल्या बहिणीसोबत असे कसे वागू शकतो, असा प्रश्न गावकऱ्यांना पडतो. वीरप्पननं कन्नड अभिनेता राजकुमारचे अपहरण केले होते. त्या प्रसंगानं तर त्याला आणखीच लोकप्रिय केले होते.

मुळात ‘द हंट फॉर वीरप्पन’ ही एका वेगळ्या अजेंडयाविषयी भाष्य करते. वीरप्पन हा लिट्टे (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) चा प्रमुख प्रभाकरनकडे मदत मागण्यासाठी गेला होता. तो आपल्याला या जंगलातून बाहेर काढण्यासाठी मदत करेल आणि पोलिसांपासून वाचवेल असे वीरप्पनला वाटत होते. ‘द हंट फॉर वीरप्पन’ या वेबसीरिजमध्ये काही गोष्टी अनुत्तरीत आहे. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांनी देखील त्या प्रकरणावर बोलणे टाळले होते.

सेल्वमणिच्या या वेबसीरीजमध्ये काही भाग हे कंटाळवाणे आहे. त्याची लांबी गरज असताना वाढवली आहे. त्यात रंजकता कमी असल्यानं काही गोष्टी खटकतात. आणि मालिका पाहतानाची जी उत्सुकता आहे तरी देखील कमी होवून जाते. यापूर्वी वीरप्पनविषयी अनेक गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून समोर आल्या आहेत. स्थानिक लोकांसाठी तो नेहमीच देवासमान राहिला आहे. त्यांची मदत करणे, त्यांना पैसे देणे, सुरक्षा पुरवणे, त्यांच्या अडचणीच्या वेळेस धावून जाणे हे त्यानं केल्याचे दिसते.

वीरप्पन मालिकेतील ठळकपणे जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे जानु सुंदरचे पार्श्वसंगीत. त्यानं वेगळी वातावरण निर्मिती केली आहे ती कमाल आहे. त्या वातावरणात प्रेक्षक म्हणून आपण दंग होऊन जातो. ही एक या मालिकेची जमेची बाजू म्हणता येईल. कारण वातावरण देखील या मालिकेचा निवेदनात्मक भाग होऊन जाते. कर्नाटकातील ती जंगलं, ती निरव शांतता हे खूप काही सांगून जाणारे आहे. त्यामुळे ही मालिका आणखी रंगतदार झाली आहे.

Movie Review

द हंट फॉर वीरप्पन

दिग्दर्शक - सेल्वमणि सेल्वराज

कलाकार - के विजय कुमार, मुथूलक्ष्मी, अशोक कुमार, सुनाद

लेखक - सेल्वमणि सेल्वराज, अपूर्वा बख्शी, फुरेस्ट बोरी

रेटिंग - ***1/2

OTT - Netflix

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT