The Kapil Sharma Show: Esakal
मनोरंजन

The Kapil Sharma Show: 'माई रे तोहार...', कपिल शर्माच्या शोमध्ये ख्रिस गेल आला अन् भोजपुरी शिकून गेला..व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) हा शो गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे. आजही या शो चा चाहता वर्ग काही कमी नाही. या शो मधील प्रत्येक व्यक्तिरेखा मजेदार आहे आणि त्यांच्या नकला पाहून लोकांची हसून हसून पुरती वाट लागते

या शोमध्ये दरवेळी नवनवीन सेलेब्स बोलावले. यात केवळ मनोरंजन विश्वातीलच नव्हे तर सगळ्याच क्षेत्रातील लोक येतात. ज्यांच्यासोबत कपिल शर्मा खूप विनोद गप्पा करतो.

कपिल शर्माचा हा शो देशातच नाही तर परदेशातही खूप आवडला आहे. नुकताच त्याच्या शोमध्ये सिंगरही आला होता. आता नुकताच निर्मात्यांनी या शोचा प्रोमो शेयर केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेट ली आणि ख्रिस गेल या आठवड्यात 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहेत. या फनी एपिसोडचा प्रोमो मेकर्सनी रिलीज केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कपिल ख्रिस गेलला भोजपुरी शिकवताना दिसणार आहे.

शोमध्ये येताच त्यांनी नमस्ते म्हणत सर्वांना थक्क केलं. त्यानंतर किकू क्रिकेटपटू ब्रेट ली लाही त्याची भाषा शिकवतो. यावेळी ब्रेट ली म्हणतो 'ओ माई रे माई...' त्यानंतर छक्के छुडा दिये, देवर ढूंढे ढोंका असे अनेक वाक्य त्यांना म्हणायला लावतात. जे ऐकून कपिल शर्मासह सर्वजण जोरजोरात हसायला लागतात.

मात्र एकीकडे विदेशी क्रिकेटरच्या तोंडून देसी बोल एकून चाहते आश्चर्यचकीत झालेच मात्र यावेळी कपिलने त्याच्या जबरदस्त इंग्रजी ऐकून चाहते गोंधळले आहे.

खरं तर कारण कपिल अनेकदा म्हणतो की त्याला इंग्रजी येत नाही. कपिल शोमध्ये तोडकंमोडकं इंग्रजी बोलून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो, परंतु आगामी भागात कपिल शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल आणि ब्रेट ली यांच्यासोबत इंग्रजीमध्ये जोरदार बोलतांना दिसत आहे.

या एपिसोडमध्ये कपिल शर्मा ख्रिस गेल आणि ब्रेट ली यांच्याशी अस्खलित इंग्रजीत बोलताना दिसत आहे. त्याचबरोबर या शोच्या प्रोमोमध्ये ख्रिस गेल अर्चना पूरण सिंगसोबत फ्लर्ट करतानाही दिसू शकतो. या एपिसोडबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT