The Kapil Sharma Show: New season of comedy show to begin soon; know date, time, cast & other deets here! Google
मनोरंजन

The Kapil Sharma Show चे टी.व्ही वर कमबॅक, 'या' दिवशी दिसणार पहिला एपिसोड

गेल्या काही दिवसांपासून टी.व्ही वरचा प्रसिद्ध कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' ने ब्रेक घेतला होता.

प्रणाली मोरे

गेल्या काही दिवसांपासून टी.व्ही (T.V) वरच्या प्रसिद्ध असलेल्या 'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show) ने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा लवकरच हा शो लोकांचं खळखळून मनोरंजन करण्यासाठी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ही बातमी ऐकल्यावर शो चा चाहतावर्ग मात्र खूश होणार १०० टक्के. सध्या कपिल शर्मा आपल्या टीमसोबत परदेशात टूरवर गेला आहे. तिथे ठिकठिकाणी शो च्या माध्यमातून ही टीम परदेशातील लोकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. पण जशी टी टूर संपेल तसं लगेचच काही दिवसांनी 'द कपिल शर्मा शो' टी.व्ही वर पुन्हा सुरु होणार असल्याची पक्की बातमी आहे.(The Kapil Sharma Show: New season of comedy show to begin soon; know date, time, cast ...)

कॉमेडी किंग कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचं निखळ मनोरंजन करत आहे. या शो च्या प्रत्येक सिझनला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. गेल्यावेळेस जेव्हा हा शो बंद झाला होता तेव्हा चाहते चिंतेत पडले होते. पण त्यांच्याच मागणीचा मान राखत अखेर निर्मात्यांनी आणि वाहिनीने शो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'द कपिल शर्मा' शो छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. अद्याप शो संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.

एका मीडिया रिपोर्ट्नुसार कळत आहे ती 'कपिल शर्मा शो' ३ सप्टेंबर पासून पुन्हा छोट्या पडद्यावर सुरू होत आहे. अर्थात यासंदर्भात कपिल किंवा त्याच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण चाहते मात्र हे ऐकून खूश आहेत की आपला आवडता शो उशिरा का होईना पण पुन्हा सुरू होत आहे. कपिलच्या या कॉमेडी टीम मध्ये भारती सिंग,चंदन प्रभाकर,कृष्णा अभिषेक,सुमोना चक्रवर्ती आणि कीकू शारदा असे कलाकार सामिल होणार आहेत. पण बातमी आहे की यावेळी काही नवीन कलाकारही कपिलच्या या शो मध्ये दिसणार आहेत.

माहितीसाठी सांगतो की,काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा शो ने ब्रेक घेतला होता. शो ऑफ एअर केल्यानंतर कपिल शर्मा आपल्या टीमसोबत यूएस टूरवर निघून गेला. आणि तिथे जाऊन परदेशी चाहत्यांचे ही टीम मनोरंजन करू लागली. कॅनडाच्या काही शहरांमध्ये देखील कपिल शर्मा आणि त्याची टीम लोकांचे मनोरंजन करणार आहेत. चाहते मात्र आता वाट पाहत आहेत की कधी कपिल आणि टीम परत येतील आणि टी.व्ही वर पुन्हा हास्याची उधळण करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT